Sunday, 18 June 2023

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त कल्याण पश्चिम येथे कार्यकर्ते पदनियुक्ती व गरजेच्या वस्तूंचे वाटप कार्यक्रम संपन्न !

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त कल्याण पश्चिम येथे कार्यकर्ते पदनियुक्ती व गरजेच्या वस्तूंचे वाटप कार्यक्रम संपन्न !

कल्याण, नारायण सुरोशी : शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त विश्वसंंत सद्गुरू वामनराव पै सभागृह, कोकण वसाहत, कल्याण (पश्चिम) येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या फंडातून कचरा कुंडी व बाकडे वाटप तसेच शिवसेना शहर शाखेकडून गरजवंताना साडी वाटप करण्यात आले व पक्षाचे कल्याण पश्चिम येथील कार्यकर्त्यांचा पद नियुक्ती कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाला शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. यावेळी बोलताना आमदार विश्वनाथ भोईर व मा. नगरसेवक संजय पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तर शहरप्रमुख रवी पाटील यांनी संघटनेची बांधणी व्यवस्थित होत नसल्याने नाराजी व्यक्त करत कल्याण पश्चिम येथील कार्यकर्त्यांनी काल आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेला कार्यक्रम यशस्वी केला यासाठी त्यांचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला आमदार विश्वनाथ भोईर, शहरप्रमुख रवी पाटील, मा. नगरसेवक संजय पाटील, अरविंद मोरे,  मोहन उगले, श्रेयस समेळ, जयवंत भोईर, सुनील खारुक, मा. नगरसेविका छायाताई वाघमारे, नेत्रा उगले, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...