लावणी कलावंत महासंघाचे लावणी गौरव पुरस्कार जाहीर !
मुंबई (शांताराम गुडेकर) :
लावणी कलावंत महासंघाचा ९ वा वर्धापन दिन सोहळा शनिवार ८ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ५ वा.दामोदर हॉल परळ येथे साजरा करण्यात येणार आहे. यावेळी लोककलेतील कलावंतांचा लावणी गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.यंदाच्या पुरस्काराचे मानकरी संचिता मोरजकर (गायन), शांताराम चव्हाण (शाहिरी), सुजाता पवार (लावण्यवती), प्रभाकर मोसमकर (वादक), गौतम कांबळे (निर्माता), डॉ. किशोर खुशाले (तालवादक), मंगेश मोकाशी (पुरुष लावणी कलाकार) तर विकास गायकवाड यांना मरणोत्तर (बतावणी कलाकार) म्हणून २०२३ चे लावणी गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मनोरंजनाच्या माध्यमातून पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याचे महासंघाच्या वतीने अध्यक्ष संतोष लिंबोरे-पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे कळविले आहे.
No comments:
Post a Comment