Sunday, 18 June 2023

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त नालासोपारा येथे भव्य आधार कार्ड शिबीराचे आयोजन....

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त नालासोपारा येथे भव्य आधार कार्ड शिबीराचे आयोजन....

नालासोपारा, प्रतिनिधी : शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त नालासोपारा येथे दोन दिवसीय भव्य आधार कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
आधार कार्ड शिबीराअंतर्गत आधार कार्ड पॅन कार्ड शी लिंक करणे, नविन आधार कार्ड, आधार कार्ड दुरूस्ती, मोबाईल नंबर लिंक करणे, बायोमेट्रिक करणे इत्यादी सेवा देण्यात येणार आहे.
जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख सुदेश चौधरी व उपतालुकाप्रमुख अजित खांबे यांच्या सहकार्यातुन 
महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, शहर प्रमुख समीर गोलांबडे उपशहरप्रमुख महेश निकम, विभागप्रमुख गणेश मुनगेकर विभाग प्रमुख दानिश करारी, महिला उपशहर संघटक आशा सातपुते, महिला विभागप्रमुख सुजाता जाधव युवा अधिकारी सलोनी गोलांबडे यांच्या विशेष प्रयत्नातुन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...