नरवीर भूमी उमरठ येथे वृक्ष वाटप आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न !
*आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम*
मुंबई (शांताराम गुडेकर) :
नरवीर भूमी उमरठ येथे आपली माती आपली माणस या सामाजिक संस्थेच्या वतीने हजारो विविध वृक्ष व विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला. ग्रामीण तसेच मुंबईतील हजारो युवकांनी आपली माती आपली माणस या स्थापन केलेल्या सामाजिक संस्थेच्या वतीने उमरठ येथे वृक्ष वाटप व उत्तीर्ण विद्यार्थांचां गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली व त्यानंतर नरवीर तानाजी मालुसरे व शेलार मामा यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राज पार्टे व मुंबई , ग्रामीण भागातील हजारो तरुणांच्या वतीने मोफत वृक्षरोपण व दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे उपस्थित होते. यावेळी उमरठ हायस्कूल देवळे हायस्कूल, साखर हायस्कूल, मोरसडे हायस्कूल आदी शाळेतील विद्यार्थ्यांना यावेळी वृक्ष वाटप व सत्कार करण्यात आले अशी माहिती सामाजिक संस्थेचे प्रसिद्ध प्रमुख व संघटक निलेश मोरे यांनी दिली.
No comments:
Post a Comment