Monday, 19 June 2023

अनेक महिन्यापासून आडगावला पथदिवे बंद !!

अनेक महिन्यापासून आडगावला पथदिवे बंद !!

चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील आदर्श गाव आडगाव येथे गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने ग्रामस्थांना अंधारात रात्र कंठावे लागत आहे.

आडगाव या सहा हजार लोकवस्ती च्या गावी मा. सरपंच रावसाहेब पाटील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या कारभारात फारशी विकास कामे झाली नाहीत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नेहमी अधून मधून भेडसावत आहे. ग्रामपंचायतीने गटारी व चौक; कॉंक्रिटीकरण; शौचालयांच्या देखभाल दुरुस्ती; कचरा व्यवस्थापन न केल्यामुळे गावात प्रचंड घाणीचे साम्राज्य व उकिरडे साचलेले दिसून येतात, अनेक वेळा सांगूनही वीज वितरण कंपनी कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी पथदिव्यांच्या दुरुस्तीचे कामाला अजिबात प्राधान्य देत नसल्याने रात्री अंधाराचा सामना करावा लागतो. गावाला शुद्ध पाण्याच्या पुरवठा करण्याचे कुठलेही नियोजन झालेले नाही, परिणामी मुदत संपल्यानंतर आता प्रशासकाच्या राजवटीत पुन्हा ग्रामीण समस्यांनी तोंड वर काढले आहे, जिल्हा परिषद सिओ व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...