Monday, 19 June 2023

सेंच्युरी रेआँन कंपनीच्या बिट्स स्कुल आँफ मँनेजमेन्ट ने केलेल्या भरणी व माती उत्तखननाची चार वरीष्ठ अधिका-या मार्फत होणार मुल्यमापन !

सेंच्युरी रेआँन कंपनीच्या बिट्स स्कुल आँफ मँनेजमेन्ट ने केलेल्या भरणी व माती उत्तखननाची चार वरीष्ठ अधिका-या मार्फत होणार मुल्यमापन !

कल्याण, (संजय कांबळे) :कल्याण तालुक्यातील कांबा पावशेपाडा येथे सेंच्युरी रेआँन कंपनीच्या बिट्स स्कुल आँफ मँनेजमेन्ट ने कल्याण तहसीलदारांनी माती उत्तखननासाठी 'केवळ १०० ब्रास' ची परवानगी दिली असताना प्रत्यक्षात मात्र 'हजारों ब्रास उत्खनन व भरणी' झाली असल्याचा आरोप करत याचे मोजमाप करण्याची मागणी पावशेपाडा येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वामन भोईर व इतरांनी कल्याण प्रांताधिकारी यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन या वाढीव भरणीचे मुल्यमापन करण्यासाठी चार वरीष्ठ अधिका-याची समिती नेमण्यात आली असून एक ते दोन दिवसात ते स्थळपाणी करुन अहवाल देणार आहेत.

कांबा पावशेपाडा येथे सेंच्युरी रेआँन कंपनीच्या बिट्स स्कुल आँफ मँनेजमेन्ट कडून शैक्षणिकविद्यापीठ निर्माण करण्याचे काम सुरू आहे.हे करीत असताना सर्व शासकीय नियम धाब्यावर बसविल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच ग्रामस्थांना अनेक आश्वासने देऊनही त्याचे पालन केले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. येथील काही एकर जमीनीवर मँनेजमेन्ट कडून माती उत्तखनन व भरणी करण्यात आली आहे. यामुळे गावास नदीच्या पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. कल्याण तहसीलदार जयराज देशमुख यांच्या कडून या मँनेजमेन्ट ला केवळ १०० ब्रास उत्तखनन करण्याची रितसर परवानगी दिली असताना प्रत्यक्षात हजारो ब्रास उत्खनन व भरणी झाली आहे. कंपनीकडून फक्त १४ हजार ब्रास भरणी केली असल्याचे सांगितले आहे,परंतु ग्रामस्थांना हे मान्य नाही. दररोज ६०० आयवा गाड्या ये जा करित होत्या, असे हे कित्येक महिने सुरू आहे. मग किती भरणी झाली असेल? त्याचे मोजमाप करावे व कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी गावातील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वामन भगत यांनी कल्याण प्रांताधिकारी यांच्या कडे केली होती.

या बाबतीत नुकतीच त्यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, पी डब्ल्यू डि, आणि भूमी अभिलेख यांची  समिती नेमण्यात आली असून ते एक दोन दिवसात जागेवर येवून वाढीव भरणी व माती उत्खनन ची मोजमाप करून मुल्यांकन करणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शिवाय यानंतर ही आमची कंपनी विरोधातील कायदेशीर लढाई सुरू राहणार असल्याचे चंद्रकांत भगत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया __

*अभिजित भांडे पाटील (प्रांताधिकारी, कल्याण) -
कल्याण नायब तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली असून ते उत्खनन व भरणी संदर्भात मोजमाप करून अहवाल सादर करतील.

*श्रीमती, सुषमा बांगर (नायब तहसीलदार, कल्याण) -
येत्या एक दोन दिवसात स्थळपाणी करून मोजमापे घेण्यात येतील.

*चंद्रकांत भगत (शेतकरी, पावशेपाडा) -
कंपनीत मोठ्या प्रमाणात उत्तखनन व भरणी झालेली आहे. त्याचे मोजमाप करताना आमच्या समोर करण्यात यावे.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...