Monday, 19 June 2023

जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती संदेश ढोणे यांच्या वाढदिवसानिमित्त नालासोपारा येथे भव्य मेहंदी स्पर्धांचे आयोजन !

जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती संदेश ढोणे यांच्या वाढदिवसानिमित्त नालासोपारा येथे भव्य मेहंदी स्पर्धांचे आयोजन !

वसई, प्रतिनिधी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती संदेश दादा ढोणे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी नालासोपारा येथे भव्य मेहंदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

महिलांमधील क्रिएटीव्हिटीस, कलाकौशल्यास वाव मिळावा, आपल्या समाजातील महिला स्वयंपूर्ण व्हाव्यात, सक्षम व्हाव्यात यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतिने नालासोपारातील महिलांसाठी मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यात प्रथम क्रमांक तन्वी हडशी, व्दितीय क्रमांक फेहमीदा कौजलगी, तृतीय क्रमांक अनन्या गुरखे, उत्तेजनार्थ  निलम सावंत यांचे क्रमांक आले.

यावेळी जिजाऊ तालुकाप्रमुख हर्षाली खानविलकर, शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, समाजसेविका अश्विनी घरत, युवा अधिकारी सलोनी गोलांबडे यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देण्यात आले.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...