Monday, 5 June 2023

वसई विरार महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची धमक दाखवावी - सौ.रूचिता अमित नाईक (महिला आघाडी शहर संघटक)

वसई विरार महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची धमक दाखवावी - सौ.रूचिता अमित नाईक (महिला आघाडी शहर संघटक)

*कोरडे आवाहन नको, कारवाई करा*

वसई, प्रतिनिधी : नालासोपारा पश्चिम मधिल अनधिकृत बांधकामे रोखण्यात आणि बिल्डरांवर कारवाई करण्यात वसई विरार महानगरपालिकेला सपशेल अपयश आल्याने रोज अनधिकृत बांधकाम वाढत चालले आहे.

महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असून अनेक ठिकाणी बांधकामांना परवानगी आहे, असे भासवून घरे विकली जाण्याचे प्रकार समोर येत आहेत. इमारतीला सिडकोची परवानगी आहे, कलेक्टर पास आहे वगैरे सांगून बिल्डर फ्लॅटची विक्री करत असले, तरी अनधिकृत घरखरेदी केल्यानंतर ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ही फसवणूक थांबवण्यासाठी पालिकेने जाहीर सूचना फलक व वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्धी करण्याची मागणी रूचिता नाईक यांनी केली.

नालासोपारा पश्चिम मध्ये सिडकोची परवानगी आहे, पालिकेची मंजुरी आहे, असे सांगून काही बिल्डर आपल्या अनधिकृत इमारतींची जाहिरात करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. काही विकासक मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सिडको व वसई-विरार शहर महापालिकेच्या बनावट परवानगीच्या आधारावर अनधिकृत घरे लोकांना विकत असल्याचे  स्थानिक नागरीकांनी सांगितले आहे. 

अनधिकृत इमारतीस नळजोडणी दिल्या जात नाही, असे पालिकेचे म्हणणे असले तरी आतापर्यंत उभ्या राहिलेल्या शेकडो अनधिकृत बांधकामांना पाण्यासाठी परवानगी तसेच नळ जोडणी मिळतेच कशी? हा प्रश्न स्थानिक नागरीकांकडून विचारला जात आहे. सर्वच भागात गेल्या वर्षभरात असंख्य अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या असून आजही बांधकामे सुरूच आहेत. अशा इमारतींना पाणी कुठून मिळते याचा आढावाही आयुक्तांनी घ्यावा,  एकीकडे जुन्या रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी झगडावे लागत असतांना अनधिकृत इमारतींना मात्र तात्काळ पाणी मिळते, यात पाणी पुरवठा विभागाचा काही हात आहे का? याची चौकशी करण्यात यावी व दोषी आढळणाऱ्या अधिकारींवर कठोर कारवाई करण्यात यावी.

या आधीही पालिकेने पत्रके छापून अनधिकृत इमारतींबाबत जनजागृतीचा प्रयत्न केला होता. मात्र वेळोवेळी पालिकेकडून अनधिकृत इमारतींसमोर लावण्यात आलेले पालिकेचे बोर्डची दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आढळून आले. मात्र पालिकेने नागरिकांना फक्त आवाहन न करता, अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई करण्याची  मागणी स्थानिक नागरीकांनी माझ्याकडे केली आहे.

याबाबत तातडीने कार्यवाही करून अनधिकृत इमारतींसमोर कायमस्वरूपी सुचना फलक लावावे अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांनी केली.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...