Monday, 5 June 2023

गरजुंना वाँटर व्हील ( पाण्याचे लोटगाडे ) चे वाटप !!

गरजुंना वाँटर व्हील ( पाण्याचे लोटगाडे ) चे वाटप !!

जव्हार, जितेंद्र मोरघा :

मोखाडा तालुक्यात पार्ले वर्ड वाईड फाउंडेशनव माऊली ग्रुप डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने बोटोशी-पाथर्डी ग्रामपंचायत मध्ये बेलपाडा, भोसपाडा, मर्कटवाडी, तसेच किरकीरेवाडी या पाडयांतील तब्बल 206 कुटुंबाना ( पाण्याचे लोटगाडे ) मोफत वाटण्यात आले. या मागील एकच उद्देश आहे की, ज्या खेडो-पाड्यातील आपल्या महिला भगिनी आहेत. त्याचा वेळ वाचावा व डोक्यावरील दुडीचे ओझे कमी व्हावं या साठी हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमासाठी भा.ज.पा. आदिवासी आघाडी पालघर जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष मिलिंदजी भाऊ झोले तसेच त्यांच्या मातोश्री जिल्हा परिषद सदस्यां पालघर जिल्हा कुसुमताई झोले यांच्या अतोनात प्रयत्नाने व त्यांच्या विनंतीस मान देऊन पार्ले वर्ड वाईड फाउंडेशन व माऊली ग्रुप डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे बोटोशी-पाथर्डी ग्रामपंचायतीतील गाव-पाड्यामध्ये पार पडला. 

हि संस्था गेल्या 2018 या वर्षांपासून विरार येथे कार्यरत आहे. त्या संस्थेचे 1) शिक्षण,2) आरोग्य, 3) स्किल डेव्हलपमेंट, 4) सामाजिक क्षेत्रात काम करणे या चार उपक्रमावर काम करत आहे.असे असताना आज या फाउंडेशन च्या कमिटीने शब्द दिला आहे की यापुढे आम्ही आपल्या सोबत येऊन मोखाडा तालुक्यातील बेरोजगार तरुणांना स्किल डेव्हलपमेंट मधून रोजगार निर्माण करून देऊ. असे आश्वासन दिले आहे.‌ 

तसेच या पूर्वी सुद्धा माऊली ग्रुपच्या माध्यमातून  आपल्या तालुक्यात खोडाळा विभागामध्ये अनेक गावांना लोट गाडे वाटप केले आहेत. ते गाव पुढील प्रमाणे 1) नाशेरा गामध्ये एकूण - 140 कुटुंबांना ( पाण्याचे लोटगाडे ) मोफत वाटण्यात आले. 2) डोंगरवाडी या गावांमध्ये एकूण - 75 कुटुंबांना वाटप करण्यात आले. 3) कुर्लोद ग्रामपंचायत मध्ये तब्बल 7 पाड्यातील एकूण - 151 कुटुंबांना water on wheel ( पाण्याचे लोटगाडे ) मोफत वाटप करण्यात आले. तसेच आज 4) बोटोशी-पाथर्डी ग्रामपंचायत मध्ये तब्बल 206 कुटुंबांना लोटगाडे वाटप करण्यात आले.तसेच आजपर्यंत माऊली ग्रुपच्या माध्यमातून एकूण 572 कुटुंबांना ( पाण्याचे लोटगाडे ) मोफत वाटप करण्यात आले आहेत.

या कार्यक्रमासाठी भाजपाचे कार्यकर्ते गंगाराम फसाळे,जितेंद्र हमरे, तसेच नेहमीच ज्यांची साथ लाभते असे या भागातील सामाजिक कार्यकर्ते  हनुमंत वाघ दादा, अनंता दोरे, मधुकर (बंडू) किरकिरे, यशवंत दोरे, पांडू भगत, सावळीराम गावंडा, संतोष दापट, गणपत कुरबुडे, इत्यादी गावकरी तसेच बोटोशी-पाथर्डी या ग्रामपंचायतीच्या सरपंच संजना संतोष दापट तसेच आशा कार्यकर्ता पार्वती गावंडा, इत्यादी मान्यवर उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...