नुकसान ग्रस्त घरांची पाहणी करून तातडीने नुकसान भरपाई मिळावी !
जव्हार, जितेंद्र मोरघा :
काल दुपारी मोखाडा तालुक्यात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सोमा रेरे सायदे, लक्ष्मण वारे दुधगाव, काशिनाथ भोवर, बुधा कामडी, विलास फसाळे उधळे हट्टीपाडा, वाकडपाडा, यांच्या घरांची पडझड असुन झाली असुन, तरी त्यांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मोखाडा पंचायत समिती उपसभापती प्रदीप वाघ यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना पत्र देऊन मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment