शिर्डीतील श्री.साईबाबा प्रसादलयात भाविकांनी मारला आमरसावार ताव,साई भक्तांने केले दोन लाख रुपये किंमती केशर आंबे दान !
भिवंडी, दिं,१३,अरुण पाटील((कोपर)
श्री.साईबाबा प्रसादालयात रोज भाविकांना जेवन दिले जाते. सध्या आंब्याचा हंगाम सुरू असल्याने एका आंबा बागायतदारांने साईबाबा प्रसादालयात आज दोन लाख रुपये किंमती केशर आंबा दान केला आहे. त्यामुळे आज भाविकांना जेवणात आमरस दिला गेल्याने भाविकांनी चांगलाच ताव मारला आहे. त्यामुळे भाविकांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण आहे.
साई भक्त साईचरणी दान म्हणून शेत मालापासुन हिरे, माणिक, मोती अर्पण करतात. साई भक्तांच्या दानातुन साई प्रसादालयात मोफत भोजन अर्थातच श्री.साईचा प्रसाद दिला जातो. शिर्डीत प्रत्येक भक्त श्री.साई दर्शनासाठी आल्यानंतर आपल्या कुवती प्रमाणे दान करत असतो.
सुगीच्या हंगामात शेतकरी आपल्या शेतीत निघालेल्या धान्यापैकी काही धान्य तर, काही शेतकरी भाजीपाला दान करतात. या व्यतिरीक्त साईभक्त पैसे, सोने, चांदी, हिरे, मोतीही दान करतात. मात्र आज साईभक्त असलेले पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील दिपक सरगळ हे आंबा बागदार शेतकरी आहे. त्यांनी साईचरणी दोन लाख रुपये किमतीचे केशर आंबे अर्पण केले आहेत. साईभक्त दिपक हे सन २०१९ पासुन आपल्या बागेतील आंबे साई चरणी दान करतात.
दिपक सरगळ यांनी दान केलेल्या या आब्यांचा रस काढण्याचे काम श्री.साई प्रसादालयात सकाळ पासुनच सुरु करण्यात आले होते. श्री. साई संस्थानमार्फत साई भक्तांच्या देणगीतुन श्री.साई प्रसादालयात भक्तांना मोफत जेवन दिले जाते. हे प्रसादालय सकाळी दहा ते रात्री दहा अखंड चालु असते. संस्थान भोजनालयात दररोज किमान चाळीस ते पंचेचाळीस हजार भाविक प्रसाद भोजनाचा लाभ घेतात. आज श्री.साई प्रसादलायात येणाऱ्या सगळ्या भाविकांना आमरसाचे भोजन देण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment