सेंच्युरी रेआँन कंपनीच्या बिट्स स्कूल आँफ मँनेजमेंन्ट विरोधात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडे तक्रार, न्याय न मिळाल्यास न्यायालयात धाव घेणार !
कल्याण, (संजय कांबळे) : प्रसिद्ध सेंच्युरी रेआँन कंपनीच्या बिट्स स्कुल आँफ मँनेजमेन्ट ने कांबा ग्रामपंचायत हद्दीत पावशेपाडा येथील शेकडो एकर जागेवर शैक्षणिक कारणास्तव मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू केले आहे. याकरिता येथे हजारो ब्रास माती भरणी केली आहे. यामुळे गावास पुराचा धोका निर्माण झाला असून शिवाय केवळ १०० ब्रास माती उत्तखनन करण्याची परवानगी असताना इतर बेकायदा भरणी केली आहे. तसेच ग्रामपंचायतीस 'शुल्लक,समजणाऱ्या या मँनेजमेन्ट विरोधात कल्याण तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्या कडे तक्रारी करुन समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अखेरीस अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती, ठाणे यांच्या कडे लेखी तक्रार केली असून त्यांच्या कडेही न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वामन भगत यांनी सांगितले आहे.
कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीत सेंच्युरी रेआँन कंपनीच्या बिट्स स्कूल आँफ मँनेजमेन्टने पावशेपाडा येथील सन ९,१०,११,१२,१३,३१ आणि ३३ मध्ये शैक्षणिक कारणास्तव मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू केले आहे. याकरिता येथे माती उत्तखनन व भरणी केली आहे. याकरिता त्यांना केवळ १०० ब्रासची महसूल विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात हजारो ब्रास भराव केला आहे. यामुळे अगोदरच पुरग्रुस्त म्हणून ओळखल्या गेलेल्या पावशेपाडा गावास अधिक धोका निर्माण झाला आहे. या विरोधात येथील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कांबा, तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्या कडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामसंभना उपस्थित राहण्याबाबत कंपनी व्यवस्थापनास पत्र पाठवले, नोटीस बजावली पण मग्रूर कंपनीने ग्रामपंचायतीस 'भाव, दिला नाही. त्यामुळे ग्रामस्थ अधिक आक्रमक झाले.
ग्रामस्थांच्या तक्रारीवरून कल्याण प्रांताधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी ग्रामस्थ व कंपनीच्या लोकांची बैठक आयोजित केली. मात्र कंपनीने कागदी घोडे नाचविल्याने व प्रांताधिकाऱ्यांनी कंपनीची बाजू घेतल्याचा आरोप करून पुढील लढाई सुरू ठेवली. कंपनी मँनेजमेन्ट ने प्रांताधिकारी यांना एक पत्र दिले आहे. यामध्ये आपण २४ हाजार ब्रास चे १:५ करोड राँयल्टी भरल्याचा टेंभा मिरवीत आहेत, परंतु याठिकाणी काम करणाऱ्या एका स्थानिक कामगाराने सांगितले की, दिवसाला ६००/७०० आयवा गाड्या भराव घेऊन येत होत्या, असे कित्येक महिने हे सुरू आहे. मग केवळ २४ हजार ब्रास च कसे काय? असा प्रश्न श्री भगत यांनी उपस्थित केला आहे.
शिवाय या बांधकामाला अद्यापही घरपट्टी लावण्यात आली नाही. घराच्या बाजूला हायटेश्नन टाँवर्स उभारला आहे. भरावामुळे गाव बुडणार आहे. कंपनीने स्वतः च्या स्वार्थासाठी गावातील काही मतलबी लोकांना हाताशी धरून राजकारण सुरू केले आहे. परंतु आपण न्यायालयापर्यंत लढणार असे चंद्रकांत भगत यांनी सांगितले. तसेच कंपनीने ग्रामपंचायतीस दिलेल्या लेखी आश्वासने देखील पायदळी तूडवली आहेत. व्यवस्थापना विरोधात जो बोलेल त्यांना कंपनी कामावरून काढून टाकत आहे. पण आम्ही ही दादागिरी सहन करणार नाही. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती कडे तक्रार दाखल केली आहे. तेथेही न्याय मिळाला नाही तर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे चंद्रकांत भगत यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment