Monday, 12 June 2023

स्फूर्ती फाउंडेशन आयोजित विविध शासकीय, पोस्ट योजना , शासकीय दाखले वाटप शिबिर संपन्न !!

स्फूर्ती फाउंडेशन आयोजित विविध शासकीय, पोस्ट योजना , शासकीय दाखले वाटप शिबिर संपन्न !! 

*शिल्पा तांगडकर यांच्या शुभहस्ते शिबिर उद्घाटन*

कल्याण (पश्चिम), प्रतिनिधी - विविध शासकीय योजना व पोस्ट कार्यालय योजना विधवा महिला व सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचल्या पाहिजे महिलांना सक्षम करण्यासाठी व छत्र हरपलेल्या महिलांचे घर चालले पाहिजे, मुलांचे शिक्षण पूर्ण झाले पाहिजे त्यांना आधार मिळावा या उद्देशाने स्फूर्ती फाउंडेशन च्या वतीने शासकीय योजनां सोबत, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, डोमासाईल आवश्यक शासकीय कागदपत्रे यांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या  शिबिराचे उद्घाटन स्फूर्ती फाउंडेशन महिला प्रमुख शिल्पा तांगडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधवा महिलांनी विविध शासकीय योजना व पोस्ट योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करुन अर्ज भरले.

अनेक विधवा महिलांना शासकीय योजना बाबत माहिती नाही त्या योजना प्राप्त होण्यासाठी लागणारे कागदपत्रे व प्रशासनाची उदासीनता याला कारणीभूत असून छत्र हरपलेल्या महिलांना त्यांच्या घरी धावपळ करणारे कोणी नसून त्यांना माहीत देणारे व सहकार्य करणारे आजूबाजूला कोणी नसतात त्यात उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला डोमासाईल रेशनकार्ड यासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारायला लावून त्यांच्या सहनशीलतेचा अंत प्रशासकीय कार्यालये व अधिकारी यांच्या कडून होत असून स्फूर्ती फाउंडेशन वतीने कल्याण तहसिलदार कार्यालयात विधवा महिलांसाठी विशेष सुविधा सुरू करण्यासाठी निवेदन दिले आहे लवकरच यामध्ये सुधारणा न‌ झाल्यास स्फूर्ती फाउंडेशन वतीने आंदोलन करण्यात येईल त्याची जबाबदारी संबंधित कार्यालय व अधिकारी यांची असेल बजरंग तांगडकर म्हणाले.

यावेळी जेष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर व कल्याण पोस्ट कार्यालय अधिकारी अशोक सोनवणे, मा.नगरसेविका लक्ष्मी बोरकर, संदिप जाधव, अलोक मिश्रा, पंकज यादव, बायोजेनिक लॅबचे ओमप्रकाश मिश्रा, अर्चना मिश्रा, प्रतिक्षा शिरवाडकर, ज्योती चौधरी यांनी महिलांना मार्गदर्शन केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश कंडु, क्रांती पाटील, ज्योती गाढवे, मनिषा मोरे, आराधना देशपांडे, सुवर्ण दूषिंग, लक्ष्मण शिंपी, शशिकांत पात्रे,मयूर घाटकर,बाळासाहेब हांडे,रवि भोसले, सुरज पवार, आयुष, अजय तिवारी, शुभम पांडे, विजय तिवारी ,कुणाल केणे यांनी विशेष सहकार्य केले..

स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर व महिला प्रमुख शिल्पा तांगडकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व आभार मानले.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...