Friday, 9 June 2023

जव्हारमध्ये सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना दिला निरोप !

जव्हारमध्ये सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना दिला निरोप !

जव्हार, जितेंद्र मोरघा :

आदिवासी विकास प्रकल्प जव्हार जिल्हा पालघर अंतर्गत अतिदुर्गम शासकीय आश्रम शाळा व वस्तीगृहवरून काम करून सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सेवापुर्ती सोहळा प्रकल्प कार्यालय जव्हार जिल्हा पालघर येथे मा. प्रकल्पाधिकारी आयुशी सिंग भा प्र से यांचे संकल्पनेतून आयोजित करण्यात आला.

सदर सोहळ्यास शासकीय आश्रम शाळा, अनुदान आश्रम शाळा व वस्तीगृह येथे ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या व विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र झटणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाच्या वतीने सन्मानपत्र शाळा ,शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी 16 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते सदर कार्यक्रम प्रकल्प अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला कार्यक्रम प्रसंगी विजय मोरे सहाय्यक प्रकल अधिकारी, उदय पवार, नियोजन अधिकारी रोहिदास तावडे, कार्यालय अधिषक तुषार पवार, संशोधन सहाय्यक व कार्यालयीन अधिकारी कर्मचारी हे उपस्थित होते सदर कार्यक्रम दरम्यान सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनाही निरोप देण्यात आला.

No comments:

Post a Comment

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे अस्थी कलश पूजन व सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन !!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे अस्थी कलश पूजन व सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन !! उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) :: सर्वांचे प्रेरणास...