शासकीय कागदपत्रांसाठी विधवा महिलांना वेगळी व्यवस्था (खिडकी) सुविधा करण्याबाबत स्फूर्ती फाउंडेशनचे कल्याण तहसिलदारांना निवेदन !!
कल्याण, प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात शासकीय कार्यालयांमध्ये विधवा महिलांची शासकीय कागदपत्रांसाठी अक्षरशः अडवणूक व पिळवणूक होत असून शासकीय कागदपत्र उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, डोमासाईल, रेशनकार्ड मिळवण्यासाठी महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे शासकीय नियमानुसार प्रत्येक कागदपत्राचा कालावधी ठरलेला आहे त्या कालावधीमध्ये ते कागदपत्र उपलब्ध करून देणे हे त्या कार्यालयाचं व त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे ही जबाबदारी झटकत अधिकारी हे महिलांना पंधरा-पंधरा महिनाभर कागदपत्रासाठी हेलपाटे मारायला लावतात अशी तक्रार महिलांनी याबाबत स्फूर्ती फाउंडेशनने कडे केली, त्याबाबत महाराष्ट्र महिला आयोग रूपाली चाकणकर यांच्या ठाणे येथील बैठकीत महिला आयोगआपल्या दारी बैठकीत तक्रार नोंदवली आहे. विधवा महिलांसाठी एक वेगळी व्यवस्था (खिडकी) सुविधा ठेवावी ज्याच्यामध्ये महिलांना थेट कागदपत्रे दिली जावी कोणतेही अडवणूक न करता त्यांना त्वरित दाखले उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करण्यात आली.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनेक विधवा शासकीय योजनांपासून वंचित आहे, त्यांना या योजनेची माहिती देखील नाही त्याचबरोबर जेव्हा शासकीय कागदपत्रे काढायला जावे लागते, त्यावेळी होणारा मनस्ताप पाहून महिला त्या योजनांकडे दुर्लक्ष करतात असे शेवटी बजरंग तांगडकर म्हणाले यावेळी तहसिलदार जयराज देशमुख यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी निवेदन स्विकारले यावेळी स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर, जेष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर, वरिष्ठ निवृत्त मुंबई पोलीस अधिकारी बजरंग ढोकरे, शशिकांत पात्रे, रेखा भट्टी, सुवर्णा दूषिंग सह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते
No comments:
Post a Comment