Friday, 9 June 2023

तिडे तळेघर बोरीवली व तिडे तळेघर ठाणे नालासोपारा बस फेरीबोटीचा निर्णयावर महाव्यवस्थापकांना प्रवासी संघटनेतर्फे निवेदन !

तिडे तळेघर बोरीवली व तिडे तळेघर ठाणे नालासोपारा बस फेरीबोटीचा निर्णयावर महाव्यवस्थापकांना प्रवासी संघटनेतर्फे निवेदन !

मंडणगड, प्रतिनिधी - मंडणगड आगाराची तिडे तळेघर महाड सायन बोरीवली व तिडे तळेघर ठाणे नालासोपारा या बससेवेला फेरीबोटीचा निर्णय बदल करण्याची मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले यांनी महाव्यवस्थापक वाहतूक श्री शिवाजी जगताप सो, उपमहाव्यवस्थापक श्री.श्रीनिवास जोशी यांच्याकडे केली आहे 
        महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून मंडणगड तिडे तळेघर सायन बोरीवली व मंडणगड तिडे तळेघर ठाणे नालासोपारा ह्या दोन्ही बससेवा फेरीबोटीतुन चालवण्यात याव्यात असे परिपत्रक वाहतूक विभागातून काढण्यात आले होते मात्र या दोन्ही बससेवेची मागणी मंडणगड तिडे तळेघर तुडील महाड बोरीवली व मंडणगड तिडे तळेघर तुडील महाड ठाणे नालासोपारा अशी मंजुरी असल्याने परिपत्रकात बदल करण्याची मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले यांनी निवेदनातून केली आहे

No comments:

Post a Comment

हेडलाईन्स - कल्याण तालुक्यात घडलेल्या वनविभागाच्या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा !!

** हेडलाईन्स.... कल्याण  तालुक्यात घडलेल्या वनविभागाच्या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा !! सविस्तर वृत्तांत ... ...