Wednesday, 21 June 2023

महाराष्ट्र योगशिक्षक संघ, मुंबई जिल्ह्यातर्फे २१ जून २०२३, ९ वे आंतरराष्ट्रीय योगदिवस उत्साहात संपन्न !!

महाराष्ट्र योगशिक्षक संघ, मुंबई जिल्ह्यातर्फे २१ जून २०२३, ९ वे आंतरराष्ट्रीय योगदिवस उत्साहात संपन्न !!

*मुबंई: उदय दणदणे*

दि.२१ - महाराष्ट्र योगशिक्षक संघ (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने संपूर्ण देशात योग साधने बाबत जनजागृती सोबतच समाजाला सदृढ ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील योग शिक्षक हा अहोरात्र झटत आहे, म्हणूनच सलाबाद प्रमाणे महाराष्ट्र योगशिक्षक संघचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार सरांच्या आदेशवरून बुधवार दिनांक २१ जून २०२३ रोजी, महाराष्ट्र योगशिक्षक संघ, मुंबई जिल्ह्यातर्फे २१ जून ९ वे आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

या प्रसंगी, घाटकोपर असल्फा येथील हिमालया सोसायटी परिसरातील बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सभागृहात योगशिबिर घेण्यात आले, यावेळी असल्फा येथील स्थायिक नगरसेवक किरणभाऊ लांडगे तसेच श्रीमती अनिता किरण लांडगे व ज्येष्ठ नागरिक निशा नारायण शेठ यांच्या हस्ते श्री ऋषीमुनी पतंजली यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून योग शिबिराला सुरुवात करण्यात आले. 
योगशिक्षक संतोष खरटमोल, सुषमा माने, साक्षी कलगुटकर यांनी सूक्ष्म व्यायाम, आसने, प्राणायाम उपस्थितांकडून करून घेतले. तसेच घाटकोपर भटवाडी येथील सरस्वती विद्या मंदिर येथे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र संघाच्या मुंबई टीमला सन्मान मिळाला. सरस्वती विद्या मंदिर व हिरानंदानी विभागातील शालेय मुलांसाठी योगवर्ग घेण्यात आले. 

या योग शिबिरात मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष खरटमोल, उपाध्यक्षा साक्षी कलगुटकर, रेश्मा धुरी, सचिव सुषमा माने, श्वेता पिसाळ, सोशल मीडिया प्रभारी प्रशांत मकेसर, सदस्य शीतल सिंग आदि उपस्थित होते. तसेच मुंबई जिल्ह्याच्या कोषाध्यक्षा रिद्धी देवघरकर आणि सचिव अमित चिबडे यांनी मुंबई येथील अक्सा बीच येथे, तर मीडिया प्रभारी निलेश मारुती साबळे यांनी दहीसर येथे,  सचिव वर्षा शर्मा व कार्यालय सचिव जयदीप कनकिया यांनी कांदिवली व मालाड येथे, उपाध्यक्षा हेमवंता जिजाबाई दहीसर आणि कांदिवली येथील शाळा व महाविद्यालया मध्ये, सदस्या स्फूर्ती जेधे यांनी दादर येथील शासकीय औद्योगिक मुलींची संस्था मध्ये व महिला प्रकोष्ठ प्रभारी डॉ. पौर्णिमा काळे यांनी प्रभादेवी व लोअरपरळ येथील प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचाऱ्यांसाठी योगशिबिर घेतले. वरील सर्व योगशिक्षकांडून संपूर्ण मुंबई मधून महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या मुंबई जिल्ह्या टीमकडून हा योगदिवस आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. 

या प्रसंगी २१ जून निमित्त संपूर्ण मुंबईमधून अडीच हजार विद्यार्थी तसेच अनेक योगसाधकांना या उपक्रमात सामावून घेतल्यामुळे सर्व योगवीर व योगवीरांगणा यांचे मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष महादेव खरटमोल यांनी आभार व्यक्त केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या!

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...