Wednesday, 21 June 2023

जिजाऊ अंध व दिव्यांग मुलांच्या निवासी शाळेत जागतिक योग्दिन उत्साहात साजरा !!

जिजाऊ अंध व दिव्यांग मुलांच्या निवासी शाळेत जागतिक योग्दिन उत्साहात साजरा !!

जव्हार,:जितेंद्र मोरघा :

विक्रमगड तालुक्यातील झडपोली या ठिकाणी असलेल्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अंध व दिव्यांग मुलांच्या निवासी शाळेतील अंध व दिव्यांग मुलांसहित तेथील शिक्षकांनीही आज योगादिनानिमित्त विविध प्रकारची आसने करून जागीतिक योग दिन साजरा करण्यात आला. 

नियमित योगासने करणे हे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहण्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. असे योगाभ्यासक यांचे मत आहे. निरोगी राहण्यासाठी योगाच्या या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताच्या नेतृत्वाखालील १७५ देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता. प्रथमच एखाद्या प्रस्तावाला एवढय़ा मोठ्या प्रमाणात अन्य देशांचे सहप्रतिनिधी लाभले आहेत .

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून झडपोली येथे असलेल्या अंध व दिव्यांग मुलांच्या निवासी शाळेत अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आयोजित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय योदिनाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. 
शाळेच्या प्रांगणात सकाळी आठ वाजता शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित झाले. यावेळी शिक्षकांनी प्र्त्याक्षिक दाखवले ते पाहून व दिलेल्या सूचनांचे पालन करत विद्यार्थ्यांनी ही आसाने केली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी देखील याचा आनंद घेत शिकवलेले योग पूर्ण केले. यावेळी शिक्षकांनी जमलेल्या सर्वांना योगाचे महत्त्व पटवून देत नियमित  योगा करण्यास प्रोत्साहन दिले. अशाप्रकारे जिजाऊ अंध व दिव्यांग मुलांच्या निवासी शाळेत जागतिक योग्दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...