घाटकोपर पश्चिम परिसरमधील वॉर्ड क्र- १२७ येथील पवार चाळ गेली अनेक वर्ष अर्धवट संरक्षण भिंत पूर्ण करा - शरद भावे
मुंबई ,(शांताराम गुडेकर) :
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन वॉर्डच्या अधिपत्यात येणाऱ्या घाटकोपर पश्चिम परिसरमधील वॉर्ड क्र- १२७ येथील पवार चाळ गेली अनेक वर्ष अर्धवट संरक्षण भिंतीमुळे धोक्यात आहे.
अनेक वर्तमानपत्रात याच्या बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत.पावसाळ्यात कधीही येथे मातीचे भूस्खलन होऊ शकते. असे झाल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबंधित प्रशासनाने यावर वेळीच लक्ष देऊन आवश्यकता असलेली संरक्षण भिंतीचे काम तात्काळ पूर्ण करावे. विभागातील स्थानिक समाजसेवक, मनसे रस्ते आस्थापना व साधन सुविधा प्रभाग संघटक शरद भावे यांनी या समस्याकडे संबंधित विभागाचे लक्ष वेदले असून त्यांनी येथे संरक्षण भिंतीची मागणी केली आहे. संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले तर रहिवाशी यांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही संबंधित विभागाला दिला आहे.
No comments:
Post a Comment