Tuesday, 13 June 2023

भोवाडी येथे रंगले कुस्त्यांचे जंगी सामने !!

भोवाडी येथे रंगले कुस्त्यांचे जंगी सामने !!

जव्हार, जितेंद्र मोरघा :

मोखाडा तालुक्यातील आसे ग्रामपंचायत मधील भोवाडी येथे गावदेवी निमित्ताने जंगी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेत शेकडो पहिलवान सहभागी झाले होते.
मोखाडा, जव्हार, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तसेच धुळे व ठाणे शहरातील तालुक्यातील देखील नामवंत पहिलवान यांनी आपला खेळ दाखवला.

यावेळी शुभेच्छा देताना तालुका प्रमुख श्री अमोल पाटील यांनी सांगितले की कुस्ती हा ग्रामीण भागातील लोकप्रिय खेळ आहे या खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते तरुणांनी अधिक सहभाग घेतला पाहिजे.

तसेच मोखाडा पंचायत समिती चे उपसभापती  प्रदीप वाघ यांनी सांगितले की आसे भागातील खेळाडू व आयोजन समितीचे सर्व सदस्य यांनी सुंदर नियोजन केले आहे, मोखाडा तालुक्यातील खेळाडू राज्य पातळीवर कुस्ती खेळला पाहिजे, तरुणांनी चांगला सराव केला पाहिजे व कुस्ती खेळला प्राधान्य दिले पाहिजे असे मत प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.

या स्पर्धेत लहान पहिलवानांचा खेळ सर्वांनाच आकर्षित करत होता. बक्षीस म्हणून बोकड, शेळी व पोल्ट्रीचे ससे ठेवण्यात आले होते तसेच मोठी कुस्ती साठी पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयांचे बक्षीस होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोखाडा नगरपंचायतचे अध्यक्ष तथा शिवसेना तालुकाप्रमुख अमोल पाटील, पंचायत समिती सभापती भास्कर थेतले, उपसभापती प्रदीप वाघ, माजी पंचायत समिती सदस्य वामन माळी, नवसु थेतले, महेश चोथे, नंदकुमार वाघ,  विठ्ठल गोडे, भाऊ भोईर, ईश्वर खोकाटे,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

गावदेवी कुस्ती स्पर्धांचे आयोजन ईश्वर बांबरे, नवश्या पाघारी, सुनील धोंडगा, देवीदास धोंडगा, संदीप पाघारी, तुळशीराम बांबरे, नवशा दिघा, बच्चु दिघा, वसंत पढेर, वामन नडगे, सुरेश धोंडगा, तुळशीराम पाघारी इत्यादी कार्यकर्त्यांनी यशस्वी आयोजन केले.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...