Wednesday, 14 June 2023

कांबा ग्रामपंचायत हद्दीतील बी बी आर टी सह भिवंडीतील बारा, अंबरनाथ आठ आणि शहापूर मधील तीन शाळा अनाधिकृत, अनेक शाळावर गुन्हे दाखल ?

कांबा ग्रामपंचायत हद्दीतील बी बी आर टी सह भिवंडीतील बारा, अंबरनाथ आठ आणि शहापूर मधील तीन शाळा अनाधिकृत, अनेक शाळावर गुन्हे दाखल ?

कल्याण, (संजय कांबळे) : पालकांच्या पाल्याची फसवणूक होऊ नये, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,पालकांची जनजागृती होऊन त्यांनी शासनमान्य शाळेतच प्रवेश घ्यावा याकरिता ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील ३३ अनाधिकृत शाळेची यादी प्रसिद्ध केली असून यामध्ये कल्याण तालुक्यातील १० शाळांचा समावेश आहे. तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीतील बी बी आर टी शाळेचे यामध्ये नाव आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील ३३ शाळा या अनाधिकृत शाळा म्हणून जाहीर करण्यात आले आहे. भिवंडी मध्ये १२, कल्याणात १०, अंबरनाथ मध्ये ८ आणि शहापूर तालुक्यातील ३ शाळांचा समावेश आहे. कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीतील बी बी आर टी, नवज्योती बेथणी विद्यापीठ, रुंदे, युनिक इंग्लिश मिडीयम स्कुल टिटवाळा, सरस्वती इंग्लिश स्कुल दहिसर, आयडियल इंग्लिश स्कुल दहिसर, सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कूल म्हारळ, सिबाँयसीस इंग्लिश स्कुल कोढेरी, रायन इंटरनँशनल इंग्लिश स्कुल डोंबिवली, जे के इंग्लिश हायस्कूल खडवली, आणि डिन्गेटी काँन्व्हेट स्कुल कोळेगाव अशा १० शाळा या अनाधिकृत आहेत.

तालुक्यातील कल्याण मुरबाड महामार्गावर कांबा ग्रामपंचायत हद्दीत बी बी आर टी ही प्रशस्त इमारत असलेली शाळा काही दिवसापूर्वीच सुरू झाली आहे. या शाळेच्या उदघाटनाला अनेक राजकीय व्यक्तीनी हजेरी लावली होती. त्यामुळे ही शाळा अनाधिकृत शाळेच्या यादीत येईल असे वाटत नव्हते.
शहापूर तालुक्यातील  एम आर राणे इंग्लिश स्कुल आंसनगाव, शारदा इंग्लिश मिडीयम स्कुल शेरे, एम जे वल्र्ड  मिडियम स्कुल आडिवली या शाळा अनाधिकृत म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८ (५) व १९ (१) मधील तरतुदी नुसार व्यवस्थापनाला १ लाख रुपये दंड व नोटिसीच्या दिनांकापासून शाळा बंद न केल्यास प्रत्येक दिवशी १० हजार रुपये प्रमाणे दंडाची कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पालकांची फसवणूक होऊ नये, पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, जनजागृती व्हावी आणि त्यांनी शासनमान्य शाळेतच प्रवेश घ्यावा म्हणून ही अनाधिकृत शाळेची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी डॉ भाऊसाहेब कारेकर यांना विचारले असता ते म्हणाले, जिल्ह्यातील अनेक अनाधिकृत शाळांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यामुळे पालकांनी शासनमान्य शाळेतच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यावा असे अवाहन ही त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...