तूर, उडीद डाळ व गव्हाच्या साठ्यावर निर्बंध जाहीर !!
मुंबई, प्रतिनिधी :- केंद्र शासनाकडील दि.12 जून 2023 च्या अधिसूचनेनुसार घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, बिग चेन रिटेलर्स, प्रोसेसर्सकरिता गव्हाच्या साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत.गव्हाच्या साठ्यावरील निर्बंध दि.31 मार्च, 2024 पर्यंत लागू राहणार आहेत. कायदेशीर घटकांकडे असणारा गव्हाचा साठा दि.12 जून 2023 च्या अधिसूचनेतील साठा निर्बंधापेक्षा जास्त असल्यास तसे https://evegoils.nic.in/wsp/login या उपभोक्ता मामले विभागाच्या संकेतस्थळावर नियमितपणे जाहीर करणे संबंधितांना बंधनकारक आहे.
या अधिसूचनेपासून 30 दिवसांच्या आत ठरवून दिलेल्या साठ्याच्या मर्यादिपर्यंत गव्हाचा साठा कमी करणे आवश्यक राहील. तसेच केंद्र शासनाकडील दि. 02 जून, 2023 अधिसूचनेनुसार तूर व उडीद डाळींच्या घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, मिलर्स, बिग चेन रिटेलर्स, इम्पोटर्स (आयातदार) करिता साठा निर्बंध लागू केलेले आहेत. डाळींवरील साठा निर्बंध दि.30 ऑक्टोबर 2023 पर्यंत निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.
कायदेशीर घटकांकडे असणारा डाळींचा साठा दि.02 जून, 2023 च्या अधिसूचनेतील साठा निर्बंधापेक्षा जास्त असल्यास तसे, fcainoweb.nic.in या उपभोक्ता मामले विभागाच्या संकेतस्थळावर नियमितपणे जाहीर करणे संबंधितांना बंधनकारक आहे. या अधिसूचनेपासून 30 दिवसांच्या आत ठरवून दिलेल्या साठ्याच्या मर्यादिपर्यंत तूर व उडीद डाळींचा साठा कमी करणे आवश्यक राहील.
केंद्र शासनाच्या अधिसूचनांपासून 30 दिवसाच्या नंतर साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे पुरवठा विभागाने कळविले आहे.
No comments:
Post a Comment