पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योगदिन मोठ्या जल्लोषात साजरा !!
भिवंडी/ठाणे, दि.२१ (ऑनलाईन वृत्तसेवा) : जागतिक योगदिना निमित्ताने पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिवंडी येथे इ.५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी योग वर्गाचे आयोजन शाळेच्या भव्य मैदानात सकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत करण्यात आले होते. या योगासन कार्यक्रमात विद्यालयातील १२०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
योगासनातील योग प्रकार ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, पादहस्तआसन, योगपूरक हालचाली यासारखी आसने सामूहिकपणे व शिस्तबद्ध पद्धतीने करून उपस्थित पालकांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे प्राचार्य मा. सुधीर घागस व उपप्राचार्य मा.राजेंद्र शिंदे यांनी केले होते. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक विश्वनाथ बिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली सामुहिक योगदिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतंजली टीमचे स्वयंमसेवक व विद्यालयातील शिक्षकांनी महत्वपूर्ण योगदान दिले.
No comments:
Post a Comment