Wednesday, 21 June 2023

नूतन विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा !!

नूतन विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा !!

योग असे जेथे, आरोग्य वसे तेथे

कल्याण/ठाणे : दि.२१ (ऑनलाईन वृत्तसेवा) २१ जून हा दिवस संपूर्ण जगभरात योग दिवस म्हणून साजरा केला जातो. पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. याद्वारे अध्यात्मिक उन्नतीही साधता येते असे पातंजल योगसूत्र ग्रंथात सांगितले आहे. जगभरातून स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून नूतन विद्यालय, कल्याण येथे सकाळ आणि दुपार अशा दोन्ही सत्रात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. योग दिवसाचे महत्त्व या निमित्ताने विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला पतंजली योग समिती मुंबईच्या योग प्रशिक्षिका आणि योग प्रशिक्षक प्रमोद पांडुरंग शिंदे उपस्थित होते. प्रशिक्षकांनी सर्व विद्यार्थांना उत्तम मार्गदर्शन केले. विविध आसने, प्राणायाम, योग याची प्रात्यक्षिके सादर झाली. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. सदर माहितीचे प्रसारण शुभांगी भोसले यांनी तर बातमी लेखन प्राजक्ता सोनावणे यांनी केले.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...