Wednesday, 12 July 2023

मी मतदार‌ (भाग १) __

मी मतदार ____

मी मतदार - १

मी गोंधळलेला. 
पूर्णपणे कनफ्यूज्ड.
मी शिकलेला किंवा 
न शिकलेला. 
विचार करणारा किंवा 
न करणारा.
कसाही असलो, तरी माझ्या हातात काय आहे?

एक तर जे लोक निवडणुकीला उभे आहेत म्हणजे उमेदवार. त्यापैकीच एकाला मत द्यायचा अधिकार आहे किंवा सगळ्यांना नाकारण्याचा अधिकार अलीकडे मिळाला आहे. 
परंतु त्याने साध्य काय होणार आहे?  वरील सर्व योग्य वाटत नाहीत असे म्हणून मी नोटाला मत दिले तर त्यातून साध्य काय होते ? शेवटी निवडून येणार तो त्यापैकीच कुणीतरी एक अगदी नोटाला जास्त लोकांनी मते दिली तरी त्या उमेदवारांच्या यादी पैकी कोणी तरी निवडून येणारच.  

व्यवस्था अशी हवी की नोटाला सर्वात जास्त मते मिळाली तर जे उमेदवार उभे आहेत ते सर्व उमेदवार पुढील सहा वर्षासाठी कोणतीही निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरतील. 

असे झाल्यास स्वतःचे राजकीय करियर सांभाळण्यासाठी उमेदवारांना काळजी घ्यावीच लागेल. कुणी उठाव आणि नॉमिनेशन फॉर्म भरावा असे ऐरे गैरे लोक उभे राहणार नाहीत. 

अशी सुधारणा कायद्यात होऊ शकेल काय ? खूप फरक पडेल असे वाटते. 

—-- सुनील देशपांडे
+91 96577 09640


No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...