रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाइड क्लबच्या २०२३-२४ 'प्रेसिडेंट' पदी विजय वैद्य यांची नियुक्ती !!
कल्याण, रविंद्र जाधव : रोटेरियन विजय लिलावती गंगाराम वैद्य यांची रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाइड च्या 1जुलै 2023 ते 30 जून 2024 या रोटरी वर्षा कारिता क्लबच्या प्रेसिडेंट पदि नियुक्ती झाली आहे. तसेच सचिव म्हणून रोटेरियन डॉ. वर्षा म्हेतर तर खजिनदार म्हणून रोट्रियन योगेश कल्हापुरे तसेच सर्व डायरेक्टर यांची नियुक्ती झाली असून त्याचा Installation Ceremony. " स्थापना समारंभ" के.सी. गांधी स्कूल, कल्याण (प.) येथे संपन्न झाला. प्रेसिडेंट विजय वैद्य आणि सहका-यांच्या कल्पनेतून आणि विचारांतून समाजपयोगी काम करण्याचा मानस आहे. गेली १० वर्ष मुरबाड येथील कुपोषित बालकांसाठी २०१६ पासून हि संस्था दर महिन्यात २०० बालकांचा महिन्याभराचा पौष्टिक खुराक आणि प्रोटिन पावडर स्वतः जाऊन अंगणवाडी शिक्षकांच्या मदतीन कुपोषित बालकांना देत आहेत. या विभागातील कुपोषणाचा दर खूपच कमी झाला आहे. त्याचबरोबर घरकाम करणारा महिला वर्ग , सोसायटी मध्ये साफ सफाई करणारा वर्ग यांच्या करिता आरोग्य विमा देणे, स्त्रीयांना, ट्रान्सजेन्डर यांना स्वावलंबी होण्याकरीता रोजगाराची, व्यवसायाची संधी मिळणून देणे, महिलांना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देणे - सायबर क्राईम, स्वच्छ जल, रेन वॉटर हारवेस्टींग यावर काम करणे , शहरातील रस्त्यावरील कचरा कुंड्यांची ठिकाणी सुशोभिकरण करणे. शहरात अत्याधुनिक गार्डन बनविणे, तसेच मेगा ब्लड कॅम्प, शरीर चिकित्सा या सारखे उपक्रम करणे... जास्तीत जास्त कण्याण शहरातील कामावर लक्ष केंद्रित करणे हे या वर्षीचे धैर्य असून आम्ही त्यावर यशस्वीरित्या काम करणार असल्याची स्पष्टोक्ती रोटेरियन विजय लीलावती गंगाराम वैद्य यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment