Tuesday, 11 July 2023

शैक्षणिक साहित्य वाटप करून पत्रकार निलेश मोरे यांनी साजरा केला वाढदिवस !!

शैक्षणिक साहित्य वाटप करून पत्रकार निलेश मोरे यांनी साजरा केला वाढदिवस !!

*आपली माती आपली माणस संघटनेचे अध्यक्ष राज पार्टे यांच्या हस्ते साहित्य वाटप*

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

           समाज आणि देशहिताचे आपल्यावर असलेले ऋण या भावनेतून आपली माती आपली माणस संघटनेचे प्रसिध्दी प्रमुख, पत्रकार निलेश मोरे यांनी आपला वाढदिवस समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा केला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज पार्टे यांच्या हस्ते घाटकोपर पश्चिम साईनाथ नगर रोड येथील ज्ञानसागर विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थांना यावेळी साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक विजय घाडगे, मारुती जाधव, दत्तात्रय सावंत, अर्चना वाडेकर आदी उपस्थित होते.
             विद्यार्थी हे उद्याचे देशाचे भवितव्य असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने शिकले पाहिजे. आपल्या शिक्षक तसेच पालकांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून शिक्षण पूर्ण केले पाहिजे. शिक्षणातून अज्ञान दूर होतो आणि आपल्या जवळील अज्ञान दूर करायचा असेल तर शिक्षण पूर्ण केले पाहिजे असे संघटनेचे अध्यक्ष राज पार्टे यांनी मार्गदर्शन प्रसंगी बोलताना केले. तर समाज आणि देशाचं आपल्यावर काहीतरी ऋण आहे या भावनेतून मी माझा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा करत असल्याचे पत्रकार निलेश मोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...