'गढूळ, पाण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची!कल्याण पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाचे पत्र !
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील रायते प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून१४ गावे व अनेक वाड्या पाड्याना गढूळ पाण्याचा पुरवठा केला जातो. या संदर्भात बातमी प्रसिद्ध होताच ही जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची असून तसे पत्र कल्याण पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाने जीवन प्राधिकरणाला दिले आहे. परंतु त्यांच्या दिरंगाई मुळे पुढील वर्षी च्या पावसाळ्यापर्यंत तरी या गावातील लोकांना माती मिश्रित 'गढूळ, पाणी च प्यावे लागणार आहे असे सध्या तरी दिसत आहे.
कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांचे पंचायत समितीच्या सर्व विभागावर बारीक लक्ष असते, कालच कल्याण तालुक्यातील जनतेच्या नशीबी गढूळ पाणी, अश्या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होतात, त्यांनी ताबडतोब पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता आशिष कटरे, तसेच श्री गहाणे यांना फोन करून या बाबतीत लक्ष द्यायला व ही समस्या सोडवायला सांगितले. तसे पाहिले तर कल्याण पंचायत समितीचा पाणी पुरवठा विभाग अंत्यंत तत्पर व कार्यक्षम म्हणून ओळखला जातो. उन्हाळ्यात सर्वत्र पाणी टंचाई निर्माण झाली असताना तालुक्यात मात्र टंचाई जाणीवली नाही, कल्याण तालुकाची टँकर मुक्त म्हणून ओळख निर्माण झाली आहे. याचे श्रेय हे पाणी पुरवठा विभागाला जाते.
तालुक्यातील एकमेव रायते प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेवर परिसरातील १४ गावे व काही वाड्या वसती आहेत. ही योजना उल्हास नदीवर असून तिला ४०/५० वर्षे झाली असल्याने ती जिर्ण व जुनाट आहे. त्यामुळे या योजनेवर नवीन शुध्दीकरण यंत्रणा बांधण्यासाठी सुमारे १० कोटीपेक्षा अधिक रक्कम मंजूर आहे. हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या कडे असून फेब्रुवारी मार्च २०२३ मध्ये जुने शुध्दीकरण पाडण्यात आली. त्यामुळे सध्या या ग्रामस्थांना गढूळ पाणीच प्यावे लागत आहे. त्यामुळे ही गंभीर बाब लक्षात घेऊन कल्याण पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाने उप विभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठाणे यांना पत्र पाठवून या योजनेवरील रायता व १४ गावे यांना गढूळ पाणी मिळत असल्याचे म्हटले आहे. रायता योजना पुर्नजीवीत करतेवेळी आपल्या विभागामार्फत शुध्दीकरण प्लांट तोडण्यात आले आहेत त्यामुळे ग्रामस्थांना शुध्दीकरण न करताच पाणी पुरवठा केला जातो. यामुळे साथीच्या आजाराची साथ उध्दभवू शकते अशी भिती व्यक्त केली आहे.
याबाबत कल्याण पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता आशिष कटरे यांना विचारले असता ते म्हणाले, दहागांव पाणी पुरवठा योजनेवर आपल्या कडून नुकतीच शुध्दीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. एमजीपीच्या ताब्यात असलेल्या खडवली, दहिसर, उत्तरशिव गोठेघर येथील कामाची पाहणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे उप अभियंता रवींद्र चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, रायता योजना ४०/४५ वर्षे जुनी आहे, हे काम एकदोन दिवसात होणार नाही त्यामुळे पुढील वर्षी पावसाळ्यापर्यंत शुध्दीकरण यंत्रणेचे काम पूर्ण करु असे त्यांनी सांगितले. त्यामुळे सध्या तरी या ग्रामस्थांच्या नशिबी, गढूळ पाणीच!त्यामुळे ग्रामस्थांनी उकळून पाणी प्यावे असे आवाहन कल्याण पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाने केले.
No comments:
Post a Comment