शेतकर्यांना ई पीक पाहणीचे प्रशिक्षण !
जव्हार, जितेंद्र मोरघा :
महाराष्ट्र सरकारचा ई-पीक पाहणी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असुन पालघर जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. जव्हार तालुक्यातील कासटवाडी ग्रामपंचायत मध्ये ई पीक पाहणी चे प्रशिक्षण देण्यात आले, यावेळी नायब तहसीलदार, तलाठी यांनी शेतकर्यांना शेताच्या बांधावर जाऊन लागवड केलेल्या क्षेत्राची ई पीक पाहणीद्वारे नोंद करीत त्याचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दिले. यात प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकाची नोंद ई-पीक पाहणी व्हर्जन २ ॲपद्वारे कशी करायची हे समजावून सांगण्यात आले. नायब तहसीलदार, तलाठी कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कार्यक्षेत्रातील तलाठी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्याने आपल्या पिकाची नोंद शेतात उभे राहून स्वतःच ई-पीक पाहणी व्हर्जन २ या ॲपद्वारे करायची आहे. सुधारित मोबारईल ॲपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आले आहे. शेतकरी ज्या वेळी पीक पाहणी करताना पिकाचा फोटो घेतील, त्या वेळेस फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर आज्ञावलीत दिसेलपीक पाहणी व्हर्जन २ हे ॲप वापराचे फायदे यासंदर्भात खोपोली मंडळातील मौजे आडोशी, ताकई, लव्हेज, कांढरोली तर्फे बोरेटी, वणी, हाळखुर्द, खालापूर व चिंचवली शेकीन या गावांमध्ये प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी ॲपच्या प्रचार, प्रसिद्धी व जनजागृतीचे काम मंडळातील तलाठी व कोतवाल यांच्यामार्फत करण्यात आले. सर्व शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी व्हर्जन २ हे ॲप डाऊनलोड करून पीक पाहणीची ऑनलाईन नोंद करावी यावेळी कासटवाडी ग्रामपपंचायत सरपंच कल्पेश राऊत, नायब तहसीलदार, तलाठी कोरडे, ग्रा.सदस्य त्रिंबक रावते, कोतवाल भुसारा प्रमोद, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment