कल्याण तालुक्यात परिस्थिती जैसे थे, रायता मानिवली,रायता आपटी रस्ता बंद, म्हारळ मध्ये घरात पाणी, कल्याण मुरबाड रस्ता सुरक्षेचा अभाव?
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यात पावसाची धुमचक्री सुरूच असून अनेक ठिकाणी आजही पाणी साचले होते. याचा नागरिकांना भंयकर त्रास होत आहे. या पावसामुळे रायता मानिवली रस्त्यावर आसाराम बापू आश्रम जवळ पाणी भरल्याने हा रस्ता बंद झाला आहे तर रायते आपटी रस्त्यावर अम्मू रिसार्ट जवळ पाणी साचल्याने हा मार्ग बंद झाला आहे. शिवाय नुकत्याच तयार झालेल्या कल्याण मुरबाड मार्गावरील म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान कांबा स्मशानभूमी जवळ वाहनांच्या व लोकांच्या सुरक्षितेची कोणत्याही प्रकारची काळजी घेण्यात आली नाही, त्यामुळे येथे मोठी घटना घडू शकते.
रात्री पासून कल्याण तालुक्यात पावसाची धुमचक्री सुरू आहे. यामुळे म्हारळ गावातील क्रांतीनगर, साईजयदीप काँलनी, आण्णासाहेब पाटील नगर, येथे अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. या पावसामुळे रायते मानिवली रस्त्यावर आसाराम बापू आश्रम जवळ ५/७ फुट पाणी भरल्याने हा रस्ता बंद झाला आहे. तर रायते आपटी रस्त्यावर पुन्हा पाणी भरल्याने या लोकांचा मार्ग बंद होऊन संपर्क तुटला आहे. याच गावातील जगण कांबरी या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर वाशिंद येथे भातसा नदीच्या पात्रात एका महिलेचा मृतदेह वाहून आला आहे.मुरबाड तालुक्यातील नांदेणी पुलावर देखील एका व्यक्ती चा पाण्यात मृतदेह सापडला आहे.
कल्याण मुरबाड या दोन तालुक्याना जोडणारा कल्याण नगर मार्गावरील म्हारळपाडा ते पाचवामैल या दरम्यान केलेल्या सिंमेट काँक्रीटच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. कांबा गावाजवळील स्मशानभूमी जवळ अर्धवट मोरीचे काम सोडल्याने व येथे पाण्याचा मोठा प्रवास असल्याने हा परिसर धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर पाणी भरल्यास येथून प्रवास करणे जिवावर बेतू शकते. ठेकेदाराचे याकडे दुर्लक्ष झाले आहे तर येथील आमदार, खासदार यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. या सर्व घटनांचा नागरिकांना मात्र त्रास होत आहे.
कल्याण तालुक्यातील म्हारळ, मोरयानगर, पाचवामैल येथील काही कुंटूबाना स्थलांतरित करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment