Wednesday, 12 July 2023

शिवसेना व जिजाऊ संस्था आयोजित नालासोपारा येथे महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण दल प्रशिक्षणाचा शुभारंभ....

शिवसेना व जिजाऊ संस्था आयोजित नालासोपारा येथे महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण दल प्रशिक्षणाचा शुभारंभ....

वसई , प्रतिनिधी : शिवसेना व जिजाऊ संस्था आयोजित नागरी संरक्षण दल महाराष्ट्र शासन, गृह विभाग पालघर यांच्या तर्फे आपत्ती काळात स्थानिक पातळीवर स्वयंसेवक निर्माण होण्याचा उद्देशाने नागरी संरक्षण दल प्रशिक्षण दिनांक १२\०७\२०२३ ते १७\०७\२०२३ पर्यंत पाच दिवसीय नागरी  संरक्षण प्राथमिक मुलभूत प्रशिक्षणाचे शुभारंभ करण्यात आले.

प्रशिक्षणाचे उध्दघाटन शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिवाकर सिंह व जेष्ठ पत्रकार रविंद्र माने यांच्या हस्ते पार पडले. प्रशिक्षणात ७० नागरीकांनी सहभाग घेतला आहे. प्रशिक्षणा मध्ये आधुनिक युध्दनिती तंत्रज्ञान व नागरी संरक्षण कामगाज व कार्यप्रणाली, आग व आगीचे प्रकार, कृत्रिम श्वसन पध्दती व उपचार, विमोचन सेवा, आपत्कालीन जखमी व्यक्तीना वाहुन  नेण्याचा पध्दती प्रथमोपचार तत्वे व साहित्य जखम व रक्तस्राव उपचार त्रिकोणीय बँडेज, दोरी व गाठीचे प्रकार या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्रशिक्षण हे 18 वर्षांवरील महिला पुरषांकरिता आहे, प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या सर्वांना महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

नैसर्गिक आपत्तीच्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी नागरी संरक्षण दलातर्फे देण्यात येणारे प्रशिक्षण केव्हाही व कुठेही उपयोगी पडू शकते. स्वयंशिस्त व स्वरक्षणातूनच आपण अधिक प्रभावीपणे आपत्कालीन परिस्थितीत काम करू शकतो, या प्रशिक्षणात जास्तीत जास्त नागरीकांनी सहभाग घ्यावा  असे जेष्ठ पत्रकार रविंद्र माने यांनी सांगितले.
यावेळी नागरी संरक्षण दल अधिकारी तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिवाकर सिंह, जेष्ठ पत्रकार रविंद्र माने, महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक शिवसेना वसई समन्वयक गणेश सुळे, शनी मंदिर ट्रस्टी व समाजसेवक किशोर नाईक, उपशहरप्रमुख महेश निकम, उपशहरप्रमुख श्रीकांत जाधव, विभाग प्रमुख दानिश करारी,  महिला विभाग प्रमुख सुजाता जाधव जिजाऊ संस्थेचे स्वयंसेवक अमित नाईक, अभिषेक गोरूले अभिषेक गायकवाड उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...