भारतीय जनता पार्टीकडुन विनवळ जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप !
जव्हार, जितेंद्र मोरघा :
जव्हार तालुक्यात आज भारतीय जनता पार्टी कडून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या, त्यात जिल्हा परिषद शाळा विनवळ, बोराळे हातेरी, गोरठण, कुतुरविहीर, शिवाजीनगर या जिल्हा परिषद शाळांना पहिली ते दहावी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी आलेल्या पाहुण्यांचे मुलींनी स्वागत गीताने स्वागत केले. यात माजी पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले यांनी मुलांना शिक्षणा संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी माजी पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले, जव्हार माजी पंचायत समती सभापती तुळशीराम मोरघा, जामसर ग्रामदान मंडळ सरपंच विठ्ठल थेतले, जानू माळी सामाजिक कार्यकर्ते, बोराळे ग्रामपंचायत उपसरपंच कुसन चिभडे, विनवळ ग्रामपंचायत माजी सरपंच संदीप खुताडे, पत्रकार जितेंद्र मोरघा, शिक्षक कर्मचारी, विद्यार्थ्यी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment