Wednesday, 12 July 2023

म्हारळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी योगेश देशमुख यांची बिनविरोध निवड !

म्हारळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी योगेश देशमुख यांची बिनविरोध निवड !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी भाजपाचे मंडळ अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य योगेश देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच तथा अध्यक्ष अधिकारी निलिमा म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. त्यामुळे परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

कल्याण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या व मालदार ग्रामपंचायत म्हणून म्हारळ ग्रामपंचायत ओळखली जाते. एकूण १७ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीच्या तत्कालीन उपसरपंच अश्विनी देशमुख यांच्या विरोधात अविश्वास दाखल केल्याने व तो मंजूर झाल्याने उपसरपंच पद हे रिक्त झाले होते. ग्रामपंचायतीमध्ये सध्या ५/१२ अशी परिस्थिती होती. परंतु अविश्वास मंजूर होण्यासाठी १३ सदस्यांची गरज आहे, हा मुद्दा घेऊन या सदस्यांनी मुंबई हायकोर्टाने धाव घेतली होती. यातील एक सदस्य प्रकाश चौधरी यांचे सदस्य पद अगोदर बाद ठरविल्याने या बाबतीत देखील कोर्टात धाव घेतली होती. परंतु कोर्टाने त्यांचे अपिल फेटाळल्याने, ते नांमजूर केल्याने उपसरपंच पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला होता.
त्यानुसार आज म्हारळ ग्रामपंचायतीच्या सरपंच निलिमा नंदू म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी योगेश देशमुख यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी एकूण १२ सदस्य उपस्थित होते यामध्ये अँड दिपक अहिरे, मोनिका गायकवाड, नंदा म्हात्रे, योगेश देशमुख, प्रमोद देशमुख, विकास पवार, अमृता देशमुख, मंगला इंगळे, बेबी सांगळे, लक्ष्मण कोंगिरे, अनिता देशमुख, यांचा समावेश होता.

याप्रसंगी म्हारळ ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसेवक नितीन चव्हाण यांनी उपसरपंच योगेश देशमुख यांचे स्वागत केलं व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. तर यावेळी आ कुमार आयलानी, भाजपाचे सचिव गुलाबराव करजुंले, माझी सभापती, अस्मिता जाधव, रंजना देशमुख, उपसभापती, पांडुरंग म्हात्रे, जिप सदस्यां ,वैशाली शेवाळे, उद्योजक सुनील देशमुख, समाजसेवक महेश देशमुख, केतन देशमुख, पोलीस पाटील दिनेश देशमुख, शिवसेना शिंदे गटाचे दिलीप गायकवाड, नंदू म्हात्रे, महेश खोत, आदी मंडळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...