Wednesday, 12 July 2023

मोहने येथे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न !

मोहने येथे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न !

*120 नागरिकांनी केली डोळ्यांची तपासणी तर 36 रुग्णांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया*

कल्याण, प्रतिनिधी : कल्याण नजीक असलेल्या मोहने येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे मोफत नेत्र चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. 

मोतीबिंदू मुक्त कल्याण शहर अभियान अंतर्गत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे जिल्हा उपक्रम प्रमुख अजित जाधव यांच्या सहकार्याने कल्याणच्या विविध भागात मोफत नेत्र चिकित्सा व आरोग्य शिबिरे भरविण्यात येत आहेत.
याच अभियानाअंतर्गत मोहने येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे जिजाऊ संस्थेतर्फे मोफत नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 120 नागरिकांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली तर 25 नागरिकांनी चष्मे घेतले तर 36 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया भक्ती वेदांत हॉस्पिटल मीरा-भाईंदर येथे मोफत करण्यात येणार आहे. 

या शिबिरात आलेल्या अनेक गोरगरीब रुग्णांनी जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांचे आभार मानले तसेच आम्हा गोरगरिबांसाठी मोफत शस्त्रक्रिया करून देत असल्याबद्दल जिजाऊ संस्थेचे कौतुक केले.

शबिर यशस्वी करण्याकरिता जिजाऊ संस्थेचे संदीप शेंडगे कल्पना पायाळ समाधान सोनवणे अमीर बेग आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...