Wednesday, 12 July 2023

कल्याण तालुक्यातील पहिला डेंग्यचा संशयित रुग्ण मामणोली मध्ये ? दहागांव प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मोहीम !

कल्याण तालुक्यातील पहिला डेंग्यचा संशयित रुग्ण मामणोली मध्ये ? दहागांव प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मोहीम !

कल्याण, (संजय कांबळे) : पावसाचा अनियमित पणा, साफसफाई चा उडालेला बोजवारा, रस्त्याच्या कडेला कच-यांचे ढीग, यातून वाढलेले मच्छरांचे प्रमाण, आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्याकडे झालेले दुर्लक्ष या सर्वाचा परिणाम म्हणून आता तालुक्यातील मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड, आदी आजाराने डोके वर काढायला सुरुवात केली असून यातील डेंग्यू चा पहिला संशयित रुग्ण मामणोली परिसरात आढळून आला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

नेहमीच येतो पावसाळा व बरोबर अनेक साथीच्या आजाराला ही घेऊन येतो असे म्हटले जाते. पावसाळ्या अगोदर, कल्याण डोंबिवली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी इत्यादी पालिका प्रशासन व जिल्हा परिषद, पंचायत समिती यांनी नालेसफाईची काम १०० टक्के झाल्याचा दावा केला होता. परंतु पहिल्याच पावसाने तो फोल ठरवला, आजही कल्याण मुरबाड रस्त्यासह गोवेली टिटवाळा, तसेच गावातील अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा कच-याचे ढिग दिसून येतात. बहुतांश गावातील रस्ते हे सिंमेट काँक्रीट चे झाले मात्र गंटारगंगा ही रस्त्यावरचं, जागोजागी खड्डे, त्यामध्ये साचलेले पाणी, डबके, शहरानजदीक असलेल्या म्हारळ, वरप, कांबा, रायते, टिटवाळा आदी सह सर्व गावामध्ये इमारतीचे बांधकाम सुरू आहेत, तेथे साचलेले पाणी, टायर, नारळाच्या कंरवट्या, ड्रम, आदीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात मच्छर,माशा, डास, वाढल्या आहेत. यातूनच डेंग्यू च्या डांसाची उत्पत्ती होते.

तालुक्यातील मामणोली येथील एका महिलेने मुरबाड येथे डेंग्यू ची तपासणी केली असता ती डेंग्यू सदृश्य लक्षणे आढळून आली. त्यामुळे दहागांव प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी व अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून रुग्णांच्या घरी भेट देऊन किटजन्य व जलजन्य सर्व्हेक्षण केले. तसेच या परिसरात धूर फवारणी केली. त्यामुळे नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, पाणी उकळून प्यावे, डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती मासाळ यांनी केले आहे. तर सध्या ग्रामीण रुग्णालयात उलटी जुलाब, सर्दी ताप याचे पेशंट वाढत आहेत असे सांगण्यात आले,तालुक्यातील अनेक गावात गढूळ पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे अशा दूषित पाण्यामुळे पुन्हा विविध साथीचे आजार उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...