मांडा टिटवाळ्यात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून विक्रमी वह्यांचे वाटप !!
*एका दिवसात तब्बल 15314 वह्यांचे वाटप*
कल्याण प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मांडा टिटवाळ्यात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
एकाच दिवसात मांडा पूर्व व मांडा पश्चिम तसेच टिटवाळा परिसरातील सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांना विक्रमी मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या एकही विद्यार्थी आर्थिक कमतरतेमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये या ध्येयानुसार कोकणातील ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या पाचही जिल्ह्यात जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना दरवर्षी 25 लाख वह्यांचे मोफत वाटप करण्यात येते.
ठाणे जिल्हा उपक्रम प्रमुख अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पश्चिम विभागामध्ये 32 हजार वह्यांचे वाटप केल्यानंतर मांडा पूर्व व मांडा पश्चिम तसेच टिटवाळा येथील सर्वच शाळेत 4731 विद्यार्थ्यांना 15 हजार 314 वह्यांचे एका दिवसात वाटप करण्यात आले. प्रत्येक शाळेत जाऊन उपक्रम प्रमुख अजित जाधव यांच्या उपस्थितीत तसेच समाजसेवक व शिवसेना टिटवाळा शहर प्रमुख विजय देशेकर आदी मान्यवरांच्या हस्ते वह्यांचे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
यामध्ये मांडा पश्चिम येथील संत ज्ञानेश्वर कंडोमपा शाळा क्रमांक 30 येथे दीडशे विद्यार्थ्यांना 354 वह्यांचे वाटप केले. श्री गणेश कनिष्ठ विद्यालय टिटवाळा येथील 679 विद्यार्थ्यांना 3456 वह्यांचे वाटप केले. रेश्माई प्राथमिक व माध्यमिक विद्यालय 631 विद्यार्थ्यांना 2072 वह्या, राष्ट्रीय विद्यालय 332 विद्यार्थ्यांना 984 वह्या, आर जी पाटील महाविद्यालय इंदिरानगर 141 विद्यार्थ्यांना 564 वह्या, डॉक्टर आनंदीबाई जोशी कंडोमपा शाळा क्रमांक 2 इंदिरानगर 150 विद्यार्थ्यांना 216 वह्यांचे वाटप तर विद्या मंदिर मांडा येथील 2648 विद्यार्थ्यांना 7668 वह्यांचे वाटप करण्यात आले.
वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी ठाणे जिल्हा उपक्रम प्रमुख अजित जाधव म्हणाले की विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शैक्षणिक अडचण असल्यास शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास तुम्ही जिजाऊ संस्थेकडे संपर्क साधा प्रत्येक विद्यार्थ्याची कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास ती सोडवण्यासाठी जिजाऊ संस्था सक्षमपणे उभी तुमच्या पाठीशी नव्हे तुमच्या सोबत राहणार आहे संस्थेचे 43 ठिकाणी वाचनालय असून टिटवाळा येथील निमकर नाका येथे संस्थेचे वाचनालय असल्याचे जाधव यांनी विद्यार्थ्यांना सांगितले जिजाऊ संस्थेचे अनेक उपक्रम असून जिजाऊ यूपीएससी एमपीएससी स्टडी सेंटर जिजाऊ पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र जिजाऊ वाचनालय असे अनेक उपक्रम असून विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन मोठे अधिकारी होण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. तर संस्था झपाट्याने मार्गक्रमण करीत आहे लोकांच्या विश्वासात पात्र ठरत आहे असे त्यांनी बोलताना सांगितले.
समाजसेवक व शिवसेना शहरप्रमुख विजय देशकर म्हणाले जिजाऊ संस्थेचे मी गेल्या अनेक वर्षापासून काम पाहत असून त्यांचे कार्य खूप मोठे आहे असे विजय देशेकर यांनी सांगीतले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जिजाऊ संस्थेचे संदीप शेंडगे साहिल मगर रुपेश पाटील समाधान सोनवणे वैभव पवार यांनी मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment