Friday, 14 July 2023

गटारीवर तालुका पोलिसांची नजर, नाकाबंदीसह गस्त पथके तैनात, हुल्लडबाजी करणाऱ्या तळीरामांना' झटका ?

गटारीवर तालुका पोलिसांची नजर, नाकाबंदीसह गस्त पथके तैनात, हुल्लडबाजी करणाऱ्या तळीरामांना' झटका ?

कल्याण, (संजय कांबळे) : गटारी अमावस्या एका दिवसावर आल्याने कल्याण तालुक्यात पोलीस देखील अँक्शन मोडवर आले आहेत, दारु पिऊन धिंगाणा घालणारे, नदी किनारी, ओलावर हुल्लडबाजी करणाऱ्या तळीरामांच्या बंदोबस्तासाठी जागोजागी नाकाबंदी सह गस्ती पथके देखील धडकणार असल्याने, ड्रिंक अँण्ड ड्राईव्ह करणाऱ्याना झटका देणार आहेत. त्यामुळे ऐन मुसळधार पावसात चढलेली उतरणार असे वाटते.

कोकणात शेतीच्या कामाचा शिणवटा घालवण्यासाठी गटारी अमावस्या साजरी केली जाते. आता हिचे लोण सर्वत्र पसरले आहे. डोंगर द-यातून वाहणारे पांढरेशुभ्र धबधबे, झरे, सध्या प्रवाहीत झाले आहे. कल्याण नगर मार्गावरील माळशेज घाट, मुंबई नाशिक मार्गावर असलेला कसारा घाट, तसेच कल्याण तालुक्यातील उल्हास, काळू, बारवी, भातसा आदी नदीच्या काठावर असलेले खडवली, रायते, दहागांव, आपटी, रुंदा, येथील पिकनिक पाँईट, तसेच मानिवली, आणे भीसोळ, मामणोली, येथील बंधारे कांबा पाचवामैल येथील डोंगर उतारावर धबधबा, आदी ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात.

मात्र गटारी अमावस्या जवळ आल्याने शिवाय बहुतांश लोक ती रविवारी च साजरी करणार असल्याचे सांगितले जाते. यादिवशी काही हुल्लडबाज तरुण मोठ्या प्रमाणात मद्यपान करून धिंगाणा घालतात, नदी, नाल्याच्या पाण्यात उतरून मस्ती करतात, बिअर व इतर बाटल्या तेथेच टाकतात, फोडतात, यामुळे ब-यावेळी स्थानिक नागरिक व यांच्या वाद होऊन हाणामाऱ्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या दिवशी अनेकावर जीव गमावण्याची वेळ आली होती. शिवाय मद्यपान करून गाडी चालवणे, ओहरसीट बसणे, इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणे असे सर्रास प्रकार घडतात.

सध्या कल्याण, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, आदी तालुक्यात चांगला पाऊस पडत आहे. नद्या सह नाले भरुन वाहत आहेत, म्हणूनच गटारीला येथे अधिक प्रमाणात तळीराम येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जिंतेद्र ठाकूर यांनी चोक नियोजन केले आहे

कल्याण मुरबाड मार्गावर म्हारळ, गोवेली, मांडा टिटवाळा येथे नाकाबंदी लावण्यात येणार आहे. शिवाय नदी किनारी, बंधारे, झरे, धबधबे येथे गस्त पथके धडकणार आहे. हाँटेल, लांजिग बोर्डिंग, उपहारगृह, आदी ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे, ड्रिंक अँड ड्राईव्ह वर लक्ष ठेवण्यात येणार आहे. प्रसंगी ब्रेथ अँनालाझर ने वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री ठाकूर यांनी दिली. त्यामुळे यावेळी ऐन पावसात गटारीच्या नावाने रिचवलेला पँक, व चढलेली नशा झटक्यात उतरणार असे वाटते. त्यामुळे तळीरामांवर ऐन गटारीत 'संक्रांत, येणार असे दिसते.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...