नोकरी सोबत उद्योजक, कलाकार, खेळाडू होण्याचेही स्वप्न बाळगा - प्रदिप वाघ
जव्हार, जितेंद्र मोरघा :
शासकीय आश्रमशाळा पळसुंडे येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला संबोधित करताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. नोकरी चे स्वप्न बाळगा पण नोकरी सोबत उद्योजक, व्यावसायिक, खेळाडू, कलाकार हे क्षेत्र देखील तुम्हाला निवडता येईल असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती व पत्रकार संघ यांच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे. मोखाडा तालुक्यातील तसेच इतरही ठिकाणी हा कार्यक्रम रोजच सुरू आहे, या कार्यक्रमा मुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असुन प्रदीप वाघ यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे असे प्रतिपादन पत्रकार संघ अध्यक्ष ज्ञानेश्वर पालवे यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप वाघ उपसभापती, प्रमुख पाहुणे म्हणून श्री युवराज गिरंधले पंचायत समिती सदस्य, सुरेश धिंडे सरपंच, ज्ञानेश्वर पालवे पत्रकार संघ अध्यक्ष, रविंद्र साळवे लोकमत चे पत्रकार, दिलीप बोढेरे ग्रामपंचायत सदस्य, रघुनाथ पाटील, भारत बुधर, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment