Friday, 14 July 2023

जव्हार तालुक्यात बविआ कडुन जिल्हा परिषद शाळेंना मोफत वह्या वाटप !

जव्हार तालुक्यात बविआ कडुन जिल्हा परिषद शाळेंना मोफत वह्या वाटप !

जव्हार, जितेंद्र मोरघा :

बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळीराम जाधव  यांच्या हस्ते जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, खरवद, खडखड, नांदगाव ,राजेवाडी, सातुर्ली, विकासवाडी, कोचाले या शाळांना वह्या वाटप करण्यात आल्या. दरवर्षी संपूर्ण पालघर जिल्ह्यात वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावेळी बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार यांनी बोलताना सांगितले की निवडणुका असो किंवा नसो आमचे कार्यालय बारा महिने व बारा तास चालू असते. बाकी पक्ष निवडणुका जवळ आल्या की वह्या वाटतील ऑफिस चालू करतील व निवडणुका संपल्या की सगळे बंद त्याच्या नेमके उलट आमचे असते, दरवर्षी वह्या वाटप कार्यक्रम आमचा असतो याचा एकच उदेश्य असतो सर्व सामान्य कुटुंबातील गरीब मुलांना या वह्यांचा उपयोग आपले भविष्य घडविण्यासाठी होवो हीच अपेक्षा असते. यावेळी बहुजन विकास आघाडीचे नेते विल्सन फरगोस ,विक्रमगड विधानसभा संघटक संतोष बुकले साहेब, जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा, उप अध्यक्ष अंनंता धनगरे, खडखड ग्रामपंचायत सरपंच सुनंदा घाटाल, उप सरपंच सुनील वळवी, माजी सरपंच, वसंत दिघा, संजय भला, राजेश वातास, ग्रामपंचायत सदस्य, संतोष भला, सुनील दखणे महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सारिका भला व वंदना ठोंबरे व रवी सुतक व बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...