Saturday, 15 July 2023

महायुतीचे खाते वाटपाचा तिढा सुटला; अजित पवारांकडे अर्थ, धनंजय मुंडेंकडे कृषी, तर मुश्रीफांना 'वैद्यकीय शिक्षण !

महायुतीचे खाते वाटपाचा तिढा सुटला; अजित पवारांकडे अर्थ, धनंजय मुंडेंकडे कृषी, तर मुश्रीफांना 'वैद्यकीय शिक्षण !

*अजित गटाशी जुळवून घ्या __शिंदे, फडणवीसांचा आमदारांना सल्ला*

भिवंडी, दीं,१५, अरुण पाटील (कोपर) :
           भाजप, शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीच्या सरकारचे बहुचर्चित खातेवाटप अखेर शुक्रवारी जाहीर झाले. त्यानुसार अजित पवार यांनी अपेक्षेप्रमाणे अर्थखाते पटकावले. तर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपण्यात आली. ईडीच्या कारवाईमुळे चर्चेत राहिलेले हसन मुश्रीफ यांच्या गळ्यात वैद्यकीय शिक्षण खात्याची माळ पडली आहे. या खातेवाटपात अजित गटाशी जुळाऊन घेण्याचा सल्ला मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिला आहे.
            विशेष म्हणजे शिवसेनेचे मातब्बर मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडचे कृषी खाती धनंजय मुंडे यांना देण्यात आले. आता सत्तारांकडे अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन खाते सोपण्यात आले आहे. तर संजय राठोड यांच्याकडील अन्न व औषध प्रशासन विभाग हे खाते राष्ट्रवादीच्या धर्मरावबाबा आत्राम यांना मिळाले. त्यामुळे राठोड यांच्याकडे मृद व जलसंधारण हे कमी महत्त्वाचे खाते आले आहे.
           छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालय, तर दिलीप वळसे पाटील यांना सहकार खाते देण्यात आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल, पशू संवर्धन खाते देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या जबाबदारी देण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते कायम ठेवण्यात आले आहे.
           राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग

(१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग.
(२) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार.
(३) उपमुख्यमंत्री अजित पवार - अर्थ व नियोजन

( भाजपचे मंत्री )

राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
गिरीश महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
विजयकुमार गावित- आदिवासी विकास
अतुल सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
सुरेशभाऊ खाडे- कामगार

(शिवसेनेचे मंत्री)

गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय राठोड- मृद व जलसंधारण
संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय सामंत- उद्योग
प्रा. तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क

(अजित पवारांच्या 'राष्ट्रवादी'चे मंत्री)

अजित पवार - उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री
धनंजय मुंडे - कृषी
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीप वळसे-पाटील – सहकार
हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
अदिती तटकरे – महिला व बालविकास
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन
संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...