Saturday, 15 July 2023

अखेर "झुंज" संपली, मराठी सिने सुष्ट्रितील "देवता" हरपला, सुपर स्टार मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे दुःखद निधन !!

अखेर "झुंज" संपली, मराठी सिने सुष्ट्रितील "देवता" हरपला, सुपर स्टार मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे दुःखद निधन !! 

*शेवटच्या काळात काम करण्याची होती इच्छा, कोणत्याच निर्मात्याने दीले नाही काम*

भिवंडी, दीं,१५,अरुण पाटील, (कोपर) :
      तळेगाव MIDC पो स्टे हद्दीत एक्सरबीया सोसायटी, MIDC रोड, आंबी येथे मराठी सिने अभिनेता रवींद्र हनुमंत महाजनी (वय ७७ वर्षे) बंद फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळून आले आहेत. ते २-३ दिवस पासून बंद फ्लॅट मध्ये पडून असल्याचे बोलले जात आहे. ते गेले ७- ८ महिन्यापासून वरील ठिकाणी एकटेच राहण्यास होते.शेवटच्या काळात त्यांना चित्रपटात काम करण्याची इच्छा होती, तसे त्यांनी एका मुलाखतीत बोलूनही दाखवले होते. मात्र कोणत्याच निर्मात्याने त्यांना काम दीले नाही.त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा मुलगा गश्मिर यांना कळविण्यात आले आहे.

       देखणेपण, रुबाबदार, दमदार अभिनयाच्या बळावर अभिनेते महाजनी यांनी १९७५  ते १९९० चा काळ गाजवला होता. 'मुंबईचा फौजदार', 'झुंज', 'कळत नकळत', 'आराम हराम' लक्ष्मीची पावले,देऊळ बंद,बेल भंडारा, दूनियाकरी सलाम, पानिपत,अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका सुपरहिट झाल्या.त्या पैकी खलनायकावर आधारित "देवता" हा चित्रपट खूपच गाजला.त्यातील त्यात  रवींद्र महजणी व आशा काळे यांच्यावर चित्रित केलेले गाणे"हा खेळ कुणाला दैवाचा कळला"हे गाणे खूपच गाजले.रविंद्र महाजनी यांनी १९७५ मध्ये व्ही.शांताराम यांच्या "झुंज "या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.अखेर त्यांची "झुंज" संपली, त्यांच्या या जाण्याने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

        मराठीतील या एव्हरग्रीन अभिनेत्याने त्याच्या करिअरची सुरुवात चक्क टॅक्सी चालवून केली होती. अभिनय क्षेत्रात येणाऱ्या पूर्वी रवींद्र महाजनी एक टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत होते. त्यांनी जवळपास ३ वर्ष त्यांनी मुंबईत टॅक्सी चालवली. पण, त्यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यामुळे ते दिवसा वेगवगेळ्या ठिकाणी जाऊन निर्मात्यांच्या भेटी घेत. आणि, रात्री टॅक्सी चालवत.
         महाजनी यांनी व्ही. शांताराम यांच्या झुंज या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केले. महाजनी यांनी मराठीसह हिंदी, गुजराती सिनेमांमध्येही काम केले आहे. त्यांनी 'लक्ष्मी', 'दुनिया करी सलाम', 'गोंधळात गोंधळ', 'मुंबईचा फौजदार' यांसारख्या सिनेमात काम केले. इतकंच नाही तर बॉलिवूडमध्येही ते झळकले आहेत. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या सिनेमातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. गश्मिर महाजनी हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो देखील चित्रपट क्षेत्रात आघाडीचा अभिनेता आहे.

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...