Saturday, 15 July 2023

दिवा शहरात ४३ अनधिकृत शाळा असल्याचे उघड !

दिवा शहरात ४३ अनधिकृत शाळा असल्याचे उघड !

ठाणे , प्रतिनिधी : ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतील दिवा शहरात ४३ शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. या घटनेनंतर ठाणे महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाकडून या शाळांना वेळोवेळी नोटीस बजावल्या आणि नियमांचे पालन न केल्याने महापालिकेच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोप करत मुंब्रा पोलीस ठाण्यात भादवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

दिव्यातील ४३ अनाधिकृत शाळांमध्ये अंदाजे १२ ते १५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या अनधिकृत शाळांवर कारवाई नंतर या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष दावणीला लागणार आहे. या विद्यार्थ्यांचे पुढे काय होणार यावर मार्ग काढण्यासाठी दिव्यातील १५ अधिकृत शाळांनी या विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी अधिकृत शाळांकडून पालकांचा भार कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना फी मध्ये माफी, गणवेशासाठी आणि पुस्तकांसाठी कुठलीही सक्ती राहणार नसल्याचे मेस्टा समाविष्ट अधिकृत शाळांकडून सांगण्यात आले आहे.

या शाळांवर तातडीने कारवाई करून या शाळा बंद झाल्या पाहिजे आणि त्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सरकारने आणि महापालिका प्रशासनाने त्यांची व्यवस्था दुसऱ्या शाळांमध्ये करून द्यावे अशी मागणी भाजपा दिवा शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...