राजेंद्र गावित यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना बिस्किटे वाटप !
जव्हार, जितेंद्र मोरघा :
पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्रजी गावित यांच्या वाढदिवसानिमित्ताने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना बिस्किटे, चिकी, लाडु अशा पौष्टिक आहाराचे वाटप शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन जेष्ठ नेते प्रल्हाद कदम यांनी केले होते. यावेळी प्रदीप वाघ मोखाडा उपसभापती, विष्णू हमरे, निलेश झुगरे, संजय वाघ माजी सरपंच, नरेंद्र येले सरपंच, गीता पाटील सरपंच, नंदकुमार वाघ उपसरपंच, अक्षय कोरडे, शुभम दुर्गुडे, विठ्ठल गोडे, खोडाळ वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक पांडुरंग गवारी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment