Monday, 24 July 2023

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मायेची सावली एकहात कर्तव्याचा या संस्थेच्या वतीने अपंगांना मदतीचा हात !

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मायेची सावली एकहात कर्तव्याचा या संस्थेच्या वतीने अपंगांना मदतीचा हात !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

            शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे कैवारी, हिंदू धर्मरक्षक, संयमी व प्रभावशाली नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे  माजी मुख्यमंत्री, सन्मा. आदरणीय पक्षप्रमुख लोकनेते श्री. उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एकहात कर्तव्याचा या संस्थेतर्फे सौ. सुरेखा प्रकाश बोटांगळे राहणार विक्रोळी सुर्यानगर मुंबई यांना व्हीलचेअर सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना स्थानिक लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनिलजी राऊत साहेब, उपनेते दत्ता दळवी, विभाग संघटक राज राजेश्वरी रेडकर, उपविभाग प्रमुख धर्मनाथ पंत, माजी नगरसेवक विश्वास शिंदे, शाखाप्रमुख उत्तम कुराडे, दीपक सावंत ,भारतीय विद्या सेना संघटक निलेश पोहकर , ग्राहक संरक्षण कक्ष विधानसभा संघटक युवराज हांडे ,महिला विधानसभा संघटक सुनिता मेहेत्रे, राजश्री परब, महिला शाखा संघटक शोभा घारे, माथाडी नेते तुकाराम चौगुले व मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.यशवंत खोपकर, संचालक श्री.सदाशिव लाड, सचिव श्री.प्रमोद चौंडकर, खजिनंदार श्री.संदीप चांदिवडे, श्री.दौलत बेल्हेकर, श्री.वसंत घडशी,श्री.श्रीकांत चिचपुरे ,श्री राजु पेडणेकर व आदी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...