Saturday, 22 July 2023

कचोरे टेकडीवरील पंधरा कुटुंबियांची महापालिकेच्या संक्रमण शिबिरांमध्ये सुरक्षित स्थलांतरणाची व्यवस्था !

कचोरे टेकडीवरील पंधरा कुटुंबियांची महापालिकेच्या संक्रमण  शिबिरांमध्ये सुरक्षित स्थलांतरणाची व्यवस्था ! 

*धोकादायक परिस्थितीत रहिवास करणाऱ्या इतर रहिवाशांना देखील प्राधान्याने स्थलांतरित करण्याचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देश*

कल्याण , नारायण सुरोशी : कल्याण पूर्वेतील  ४/जे प्रभागक्षेत्र परिसरातील कचोरे व नेतिवली ह्या भागातील टेकडीवर व टेकडीलगत कच्या पक्क्या स्वरूपाच्या चाळी , झोपडीसदृश्य घरे आहेत. त्या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांना दर वर्षी पावसाळ्यापूर्वी इतरत्र ,सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याबाबत महापालिकेमार्फत नोटिसा देण्यात येत असतात.  ह्या वर्षी सुद्धा जून महिन्यामध्ये याप्रमाणे अंदाजे 140 नोटिसा देण्यात आल्या होत्या, त्यानुसार काही कुटुंबे इतरत्र सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत झाली  परंतु काही नागरिक इतरत्र स्थलांतरीत झालेले नसल्याने, सतत होणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर  संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे व अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांचे निर्देशानुसार जे प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी आपत्कालीन पथक तसेच स्थानिक टिळक नगर पोलीस स्टेशन चे अधिकारी/ कर्मचारी यांचे मदतीने सदर ठिकाणी असलेल्या 15 कुटुंबाना सुरक्षितरित्या महापालिकेच्या संक्रमण शिबिरामध्ये (शाळा/हॉल) मध्ये स्थलांतरीत केले असून इतर कुटुंबाना सुद्धा स्थलांतरीत करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
स्थलांतरीत करण्यात आलेल्या कुटुंबातील नागरिकांना जेवण्याची व पाण्याची सोय महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

प्रजासत्ताक दिनानिमित्त विमला तलाव गार्डन मध्ये साफसफाई !

प्रजासत्ताक दिनानिमित्त विमला तलाव गार्डन मध्ये साफसफाई ! ** हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानाची सुरुवात. उरण दि २७, (विठ्ठल ममता...