घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त अतुल पाटील यांनी घेतली महानगरपालिका अधिकारी व पर्यावरण रक्षक यांची बैठक !!
कल्याण , नारायण सुरोशी : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिनांक 22/07/2023 रोजी आपल्या दालनात महानगरपालिका अधिकारी व पर्यावरण रक्षक यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्रभाग क्षेत्र स्तरावर पर्यावरण रक्षक नागरीकांचे शहर स्वच्छतेतील योगदान, नागरिकांची घनकचरा वर्गीकरण विषयक जगजागृती, प्रभागक्षेत्र निहाय सहा. आयुक्त, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, मुकादम, सफाई कर्मचारी, पर्यावरण रक्षक, एनजीओ, ज्येष्ठ नागरीक मंडळे, महिला बचत गट यांचे सहभाग असलेले व्हॉट्स ॲप ग्रुप चा प्रभावी वापर इ. विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी सौ. सुषमा मांडगे, सहा. आयुक्त घ. क. व्य, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व पर्यावरण रक्षक नागरीक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment