Sunday, 23 July 2023

महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनी कडून साई संस्थानला आता पर्यंत १५ गाड्यांची भेट; आज दिली २७ लाखांची एक्स.यु. व्ही गाडी भेट !!

महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनी कडून साई संस्थानला आता पर्यंत १५  गाड्यांची भेट; आज दिली २७ लाखांची एक्स.यु. व्ही गाडी भेट !!

भिवंडी, दिं,२३,अरुण पाटील (कोपर)
            शिर्डीच्या साईबाबांना भाविक वेगवेगळ्या स्वरूपात दान करत असतात. यात नामांकित कंपन्याही मागे नाहीत. महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीकडून साई संस्थानला १५ गाड्या भेट स्वरूपात देण्यात आल्या आहेत. आजही  २७ लाखांची एक्स यु व्ही.गाडी कंपनीकडून साईचरणी भेट म्हणून दिली आहे.
             शिर्डीच्या साईबाबांना भाविक वेगवेगळ्या स्वरूपात दान करत असतात. अनेक भाविक पैसे, सोने, चांदी, माणिक, मोतीही दान करतात तर शेतकरी आपल्या शेतातील निघालेले पाहिले पिकही दान करतात. याचप्रमाणे देशातील वाहन क्षेत्रात अग्रगण्य असलेला महिंद्रा अँण्ड महिंद्रा ग्रुप त्यांच्याकडे उत्पादित होणारी नवीन पहिली गाडीही साई चरणी दान करत असतात. आजही साईबाबा संस्थानला या ग्रुपच्या वतीने पंधरावी कार दान स्वरूपात दिली गेली आहे.
           देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डीच्या साईबाबा चरणी भाविक कोट्यवधीचं दान देतात. याच बरोबरीने अनेक भाविक साई संस्थानच्या रुग्णालयात, प्रसादालयात, निवास व्यवस्था या ठिकाणी उपयोगी येईल अशाही वस्तू दान स्वरूपात देत असतात. यात देशातील वाहन निर्मिती क्षेत्रात अग्रगण्य असलेला महिंद्रा ग्रुप कडून उत्पादित होणारी पहिली चारचाकी असो किंवा दुचाकी एवढेच नव्हे तर ट्रॅक्टरही दान स्वरूपात साईबाबा संस्थानला देण्यात आले आहे.
            साईबाबा संस्थानच्या इतिहासात आता पर्यंत महिंद्रा ग्रुपने १५ वाहने दान स्वरूपात दिली आहेत. आज महिंद्रा कंपनीची एक्सयुव्ही ७०० या मॉडेल मधील एटोमॅटीक मॉडल कार दान स्वरूपात दिली आहे. या गाडीची ऑनरोड किंमत २७  लाखाच्या जवळपास असल्याचे साई संस्थानकडून सांगण्यात आले आहे. आज साईबाबांच्या मध्यान्न आरतीनंतर महिंद्रा कंपनीचे मुख्य व्यवस्थापक नागराज यांच्या हस्ते सपत्नीक या गाडीची विधीवत पूजा करण्यात आली. यानंतर गाडीच्या चाव्या साई संस्थानकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.
             साई दर्शनासाठी दरवर्षी अडीच कोटीहून अधिक भाविक साईदरबारी हजेरी लावतात. दिवाळी व सुट्टयांमध्ये विक्रमी गर्दी असते. वर्ष २०२२ च्या दिवाळीत २० ऑक्टोंबर ते ५ नोव्हेंबर या १५ दिवसांच्या काळात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या पंधरा दिवसात भाविकांनी १७ कोटी ७७ लाख ५३ हजारांचे दान साईबाबांना अर्पण केल्याची माहिती संस्थानच्या नाव नियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...