डॉक्टर आनंद धवन यांचे मेमोरियल हॉस्पिटल चे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न !
कल्याण , प्रतिनिधी : डीडी मेमोरियल हॉस्पिटल चे भव्य उद्घाटन आंबिवली मोहने येथे करण्यात आले, 'रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा' आहे असे डॉक्टर आनंद धवन यांनी सांगितले जिथे जन्मलो जिथे राहिलं जिथे वाढलो आणि ज्यांनी सांभाळून घेतलं त्यांचा एक ऋणी म्हणून मी आपलं काहीतरी देणे लागतो म्हणून आपल्या माणसांसाठी एक प्रामाणिक रुग्णसेवेचा प्रयत्न करणार आपल्या हॉस्पिटलमध्ये आलेल्या प्रत्येक रुग्णांना अल्प दरात सेवा दिली जाईल असे डॉक्टर धवन यांनी सांगितले अत्याधुनिक उपकरणासहित सुसज्ज अति दक्षता विभाग सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया सर्व रोगांचे निदान व उपचार सर्व तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध असणार हॉस्पिटलचे उद्घाटन डॉक्टर धवन यांच्या आई वडिलांच्या हस्ते करण्यात आले.
मोहने येथील सर्व सामान्य परिवारातील एक मुलगा डॉक्टर आनंद धवन , स्वतःच्या हुशारीने मुंबई येथील जे.जे. हॉस्पिटल मधून शिक्षण पूर्ण झाल्यावर गेली अनेक वर्षे टिटवाळा, मोहने येथे प्रॅक्टिस करत आहेत, त्यांचे योग्य निदान, योग्य उपचार यामुळे अल्पावधीत लोकप्रिय झाले, आज अनेक रुग्ण त्यांच्या मुळे बरे झाले आहेत. आज आपण ज्या शहरात लहानाचे मोठे झालो त्या ठिकाणी आपण काही तरी केले पाहिजे या उद्दिष्टाने आज त्यांनी सर्व सुविधा युक्त असे एक मेमोरियल हॉस्पिटल बनवले व आज त्याचे उद्घाटन झाले या उद्घाटनप्रसंगी बरेचसे कार्यकर्ते मंडळी डॉक्टर्स नगरसेवक व मित्रमंडळी यांनी भेट दिली.
No comments:
Post a Comment