नालासोपारातील विविध समस्यां सोडवण्याबाबत शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांची खासदार राजेंद्र गावित साहेबांकडे मागणी...
*महिलांसाठी विशेष नालासोपारा (प) ते वसई तहसिलदार कार्यालय बससेवा सुरू करण्याबाबत मागणी केली*
नालासोपारा मधिल हजारो विद्यार्थीनी या वसई येथे कॉलेजसाठी व महिला या वसई येथे कामासाठी रोज ये जा करतात प्रवाशांमध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वसई येथे जाण्याकरीता लोकलने प्रवास करावा लागतो सकाळी व सायंकाळी लोकलला गर्दी अधिक असल्याने महिला व विद्यार्थीनींना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच शासकीय योजनांसाठी लागणारे दाखले काढण्यासाठी तहसिलदार येथे जावे लागते. नालासोपारा (प) ते वसई तहसिलदार बस सुरू करण्याबाबत वर्तक कॉलेज येथिल विद्यार्थ्यानीनी रूचिता नाईक यांच्या कडे मागणी केली होती.
महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा याकरिता महिलांसाठी विशेष नालासोपारा (प) बस डेपो पासुन समेळगाव, सोपारागाव मार्गे निर्मळ, वसई, तहसिलदार पर्यंत बससेवा सुरू करण्याबाबत गेली 6 महिन्यांपासून मागणी करून पाठपुरावा करत असल्याचे साहेबांना सांगितले याबाबत तातडीने साहेबांनी परिवहन विभागाचे आयुक्त कामठे यांना संपर्क करून आठवड्याभरात बससेवा सुरू करण्याबाबत आदेश दिले.
*महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बाधण्याबाबत महापालिका आयुक्तांकडे अनेक वेळा मागणी करून दुर्लक्ष करत असल्याने थेट खासदार राजेंद्र गावित साहेबांकडे मागणी केली....:-*
वसई विरार नालासोपारा शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत व महापालिकेने विविध ठिकाणी बांधलेल्या 94 सार्वजनिक स्वच्छतागृहांमधूनच महिलांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना स्वतंत्र स्वच्छतागृहेच नाही आहेत. हि अतिशय धक्कादायक व लाजिरवाणी बाब आहे,
परिसरात पुरुषांची नेहमी गर्दी असल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. महापालिकेने फक्त महिलांसाठीच स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारलेली नाहीत. *आमदारांची पत्नी मनपात प्रथम महिला महापौर होऊन गेल्या तरी त्यांच्या काळात फक्त या विषयावर चर्चाच झाल्या.*
वसई-विरार- नालासोपारा या शहरांमध्ये स्वच्छतागृहे बांधण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे, परंतु याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.
वसई विरार महानगरपालिकेचा महिलांबाबत एवढा निष्काळजीपणा का?
याबाबत सहाय्यक आयुक्तांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क झाला नाही याबाबत आयुक्तांकडे बैठक लावण्यात येणार आहे.
*नालासोपारा मधिल एकमेव समेळगाव येथिल स्मशानभूमीची विद्युत शवदाहिनी सुरू करण्याची मागणी केली*
नालासोपारा (प) मधिल एकमेव समेळगाव येथे स्मशानभूमी आहे नालासोपारा (प) हा परिसर दाट लोकवस्तीचा परिसर आहे जास्त लोकसंख्या असल्याने मृत्युदर हि त्याप्रमाणात आहे.
सर्वात आधी मी विद्युत शवदाहीनी बसवण्याची व सुरू करण्याची मागणी केली होती. विद्युत शवदाहिनी बसवली पण अद्याप पर्यंत महापालिकेला विद्युत शवदाहिनी सुरू करण्यास मुहूर्त मिळत नाही.
याबाबत तातडीने दखल घेत खासदार साहेबांनी महापालिका अधिकारी लाड यांना संपर्क करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
No comments:
Post a Comment