Wednesday, 5 July 2023

शिवसेना (ठाकरे गट) आमदार अजय चौधरीजींच्या नेतृत्वाखाली के.ई.एम रुग्णालयाच्या डीन डॉ.संगीता रावत यांच्यासोबत संयुक्त बैठक !!

शिवसेना (ठाकरे गट) आमदार अजय चौधरीजींच्या नेतृत्वाखाली के.ई.एम रुग्णालयाच्या डीन डॉ.संगीता रावत  यांच्यासोबत संयुक्त बैठक !!

*बैठकीत महत्त्वपूर्ण आणि रुग्णाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक विषयांवर चर्चा*

मुंबई, (निलेश कोकमकर/शांताराम गुडेकर) :

            शिवसेना आमदार विधिमंडळ गटनेते मान.अजय चौधरी साहेब (ठाकरे गट) यांच्या नेतृत्वाखाली शिवडी विधानसभा शिवसेनेच्या शिष्टमंडळाची आणि के.ई.एम रुग्णालयाच्या डीन डॉ.संगीता रावत मॅडम यांच्यासोबत के.ई.एम सभागृहात संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बऱ्याच बैठकीत महत्त्वपूर्ण आणि रुग्णाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक विषयासंदर्भात चर्चा झाली. त्या मध्ये के.ई.एम रुग्णालयामध्ये  येणाऱ्या पेशंटला सिटीस्कॅन व एम.आर.आय, सोनोग्राफी करण्यासाठी दोन महिने किंवा त्यानंतरच्या तारखा दिल्या जातात. तसेच काही विभागात शस्त्रक्रियांसाठी देखील दोन दोन महिन्यांच्या तारखा दिला जातात त्यांचा देखील कालावधी कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा. ओ.पी.डी पेशंटला मोफत मिळणारी काही औषध आता मिळणं बंद झाली आहेत ती पुन्हा उपलब्ध करून देणे. रुग्णालयामध्ये सध्या स्थितीत असलेल्या एम.आर.आय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी मशीन मध्ये वाढ करणे.

          रुग्णालयामध्ये डॉक्टर, वॉर्ड बॉय, नर्सेस, प्रशासकीय कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, टेक्निशियन, यांची जी रिक्त पदे आहेत त्यांची भरती करणे.  या सर्व विषयासंदर्भात चर्चा झाल्यानंतर एक गोष्ट आढळली, ती म्हणजे प्रशासनाकडून एम.आर.आय. मशीन सिटीस्कॅन मशीन, सोनोग्राफी मशीन खरेदी करण्यासाठी देण्यात आलेले प्रस्ताव सी.पी.डी विभागात प्रलंबित असल्यामुळे जोपर्यंत या नवीन मशिन्स के.ई.एम.मध्ये उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत परिस्थिती सामान्य होणार नाही याची कबुली के.ई.एम प्रशासनाने दिली. यावर आमदार चौधरी साहेब यांनी या विषयावर  येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेमध्ये आवाज उठवू असे सांगितले. तसेच माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी यासंदर्भात लवकरच सीपीडी विभागात बैठक लावून प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रशासनाला आश्वस्त केले. 
         या बैठकीत शिवसेनेच्या वतीने माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, श्रद्धा जाधव तसेच नगरसेवक सचिन पडवळ, अनिल कोकीळ, दत्ता पोंगडे, सिंधू मसुरकर, उर्मिला पांचाळ आदी माजी नगरसेवक उपस्थित होते. तसेच प्रशासनाच्या वतीने के.ई.एम रुग्णालयाच्या डीन डॉ.संगीता रावत, डॉ. हरीश पाठक तसेच के.ई.एम रुग्णालयाचे सुप्रिटेंडट  डॉक्टर मोहन देसाई सर, डॉक्टर प्रवीण बांगर सर तसेच रुग्णालय प्रशासकीय अधिकारी, रुग्णसेवक प्रदीप मोगरे सर, rediolohy विभाग अधिकारी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...